IMPIMP

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! फक्त 150 रुपये गुंतवा अन् मिळवा तब्बल 20 लाख रुपये; जाणून घ्या

by nagesh
Best Govt Saving Schemes | best govt saving schemes for child to senior citizens from ssy to ppf know all details here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post Office Scheme | सुरक्षित आणि योग्य गुंवतणूकीचा विश्वासार्ह चांगला पर्याय म्हणजे भारतीय पोस्ट ऑफिसकडे
(Indian Post Office) पाहिले जाते. भारतीय पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक लाभदायक योजना आणत असते. यामधून गुंतवणूकदारांना
उत्तम लाभ देखील होतो. दरम्यान पोस्ट ऑफिसने (Post Office Scheme) एक जबरदस्त योजना समोर आणली आहे. या योजनेमध्ये फक्त दररोज 150 रुपये गुंतवले, तर 20 लाखांहून जादा रक्कम मिळू शकणार आहे. या योजनेबाबत जाणून घ्या.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ योजना (Public Provident Fund PPF Scheme) ही पोस्ट ऑफिसची योजना आहे. आपण आपल्या दररोजच्या खर्चातून 100 ते 150 रुपये रोज बचत करू शकता. त्याचबरोबर हे पैसे तुम्ही सरकारच्या छोट्या बचत योजनांमध्ये टाकले तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकणार आहे. असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (Post Office Scheme)

 

तुमचे वय 25 वर्षे असेल तर लहान रकमेत मोठा परतावा मिळवण्याची मोठी संधी आहे. समजा तुमचे उत्पन्न 30 ते 35 हजार रुपयांपर्यंत असेल, तर इतर कोणत्याही बचतीशिवाय तुम्ही दररोज 100 ते 150 रूपये वाचवू शकणार आहे. त्याचबरोबर ही बचत तुम्हाला 45 व्या वर्षी वीस लाख रुपयांपेक्षा अधिक पैसा देऊ शकते. जर तुम्ही रोज 150 रुपयांची बचत पीपीएफ (PPF Scheme) मध्ये गुंतवणूक केली तर ते मासिक 4500 रुपये होणार आहे.

 

दरम्यान, प्रति महिना 4500 रुपयांची गुंतवणूक केल्यास वार्षिक 54,000 रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तसेच वीस वर्षात एकूण गुंतवणूक 10.80 लाख रुपये असेल. 7.1 टक्के वार्षिक चक्रवाढीमध्ये तुम्हाला वीस वर्षांमध्ये 20 लाखांपेक्षा अधिक निधी तयार होणार असल्याचं म्हटलं आहे. Public Provident Fund (PPF)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

PPF खाते सुरू केल्यास अधिक लाभ –
हे खाते फक्त 100 रुपयात सुरू करता येते. त्याचबरोबर जॉईंट खातेही उघडता येते. 15 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यानंतरही 2 वेळा 5-5 वर्षांसाठी वाढवता येतो.
यामधून मिळणारे उत्पन्न करमुक्त असते. तिसर्‍या आर्थिक वर्षापासून खात्यावर कर्ज देखील घेता येते.
बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही पीपीएफ खाते सुरु करू शकणार आहात.
पीपीएफवर 7.1 टक्के व्याजदर आहे, जो वार्षिक चक्रवाढ आहे. या खात्यामध्ये वर्षभरात किमान पाचशे रुपये गुंतवणे गरजेचे असणार आहे.
अधिकाधिक 1.5 लाख रुपये गुंतवू शकणार आहात.

 

Web Title :- Post Office Scheme | you can earn more than rs 20 lakh on an investment of just rs 150 daily know ppf post office yojana Post Office PPF Scheme

 

हे देखील वाचा :

Dr Neelam Gorhe | टायर कंपन्यांकडून राज्यातील ग्राहकांची फसवणूक होत असल्याने राज्य ग्राहक मंच यांनी ‘स्वाधीकारे’ चौकशी करण्याची उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची सूचना

Pune Crime | पुण्यात 17 वर्षाच्या मुलीचा गळा दाबून चाकूने पाठीत, छातीवर, पोटावर व पायावर सपासप वार; चंदननगर परिसरातील घटनेने प्रचंड खळबळ

Pune School Update | ‘पुण्यात पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार’ – अजित पवार (व्हिडीओ)

 

Related Posts