IMPIMP

वाझेंना वाचविण्यामागे सरकारला वरूण सरदेसाई यांना वाचवायचं आहे का ?

by pranjalishirish
Does the government want to save Varun Sardesai after saving sachin vaze ? bjp leader nitesh rane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – “सचिन वाझे Sachin Vaze यांची वकिली करण्यासाठी मुख्यमंत्री उतरतात, शिवसेनेचे नेते पुढे का येत आहेत? या मागे मोठं कारण आहे,” असे भाजपचे नेते नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमत्र्यांची भेट घेतली आहे, भाजपचे नेते नितेश राणे पत्रकार परिषद घेत आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “सचिन वाझेंना Sachin Vaze  वाचविण्यामागे ठाकरे सरकारला वरूण सरदेसाई यांना वाचवायचं आहे का,” असा सवाल राणे यांनी केला आहे.

“नोव्हेंबरमध्ये आयपीएल स्पर्धा झाली. त्याआधी मुंबईत बेटिंग जोरदार सुरू होती. या बेटिंग करणाऱ्यांना सचिन वाझे यांचा फोन जायचा आणि त्यांना सांगतात की तुमची सर्व माहिती माझ्याकडे आहे. तुम्हाला अटक होण्यापासून वाचायचं असेल तर १५० कोटी द्या. जर सर्व रक्कम दिली नाही तर तुम्हाला अटक करू, असं सचिन वाझे Sachin Vaze त्यांना धमकी द्यायचे, त्यानंतर सचिन वाझेंना दुसऱ्या व्यक्तीचा फोन जातो, त्याला विचारतात की एवढी रक्कम तू मागितली आहेस, त्यात आम्हाला किती देणार? असा सवाल वाझेंना एक व्यक्ती करतो. या व्यक्तीला वाय सेक्युरिटी देण्यात आली आहे. हा व्यक्ती अनेक वेळा मुख्यमंत्री कार्यालयात, पालिकेत असतो. या व्यक्तीचं नाव वरुण सरदेसाई आहे,” असा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केला आहे. वाझें बरोबर शिवसेनेच्या नेत्याचे चॅट झाल्याचा गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे. ज्या दिवशी वाझेंना अटक झाली त्याच दिवशी सकाळी ११ वाजता ते कोणाला भेटले ? हे शोधावं असं नितेश राणे यांनी सांगितले.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी का

Related Posts