IMPIMP

Dr. Shirish Gode | भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

by nagesh
Dr. Shirish Gode | BJP district president Dr. Shirish Gode joins Congress

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Dr. Shirish Gode | मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. तसेच नुकतंच विधान परिषदेची निवडणुक होणार आहे. तर, काही जिल्ह्यातील महापालिका निवडणूक देखील आगामी वर्षात होणार आहेत. या पार्श्वभुमीवर सर्व पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र दुसरीकडे पक्ष बदलण्याचे वारेही जोर धरत आहे. वर्धा जिल्हयात भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. वर्धा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे (Dr. Shirish Gode) यांनी राजीनामा देत आज काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

वर्धा जिल्हा अध्यक्षाच्या काँग्रेस प्रवेशाने (Congress) राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
गेल्या दोन महिन्यापुर्वी भाजपचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना राजीनामा देत असल्याचे पत्र पाठवले होते.
अखेर आज गोडे (Dr. Shirish Gode) यांनी राजीनामा दिला आहे. आणि काँग्रेस पक्षाची वाट धरली आहे.
गोडे हे दोन वर्षांपासून अध्यक्ष होते. त्यापूर्वी 2014 मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते.
काँग्रेसचे खासदार राहिलेल्या संतोषराव गोडे यांचे चिरंजीव असलेल्या डॉ. गोडे यांनी आरोग्य खात्यात वरिष्ठ पद भूषवून राजीनामा देत काँग्रेसचे राजकारण सुरू केले होते.
मात्र संधी न मिळाल्याने त्यांनी बसपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती.
पुढे त्यांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केल्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये (BJP) घुसमट होत असल्याची भावना डॉ. शिरीष गोडे हे व्यक्त करतच होते.
दरम्यान त्यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. तसेच एका कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस वेणूगोपाल (Venugopal), महाराष्ट्र प्रभारी एच के पटेल (H. K. Patel),
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), पालकमंत्री सुनील केदार (Sunil Kedar), ज्येष्ठ नेत्या चारुलता टोकस (Charulata Tokas),
जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर (Manoj Chandurkar) यांच्या उपस्थितीत डॉ. गोडे यांनी काँग्रेस प्रवेश केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Dr. Shirish Gode | BJP district president Dr. Shirish Gode joins Congress

 

हे देखील वाचा :

Good Governance | प्रशासनात सुधारणा करण्यासाठी पीएम मोदी यांनी 77 मंत्र्यांना 8 गटांत विभागले, दिले ‘हे’ निर्देश

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम देतीय 15 लाख रुपये कमावण्याची संधी ! जाणून घ्या किती गुंतवणुकीवर मिळू शकतो लाभ

PMSMY | मोदी सरकारची खास योजना ! रोज 2 रुपये गुंतवा अन् वृद्धापकाळात मिळवा 36 हजारांची पेन्शन, जाणून घ्या

 

Related Posts