IMPIMP

Good Governance | प्रशासनात सुधारणा करण्यासाठी पीएम मोदी यांनी 77 मंत्र्यांना 8 गटांत विभागले, दिले ‘हे’ निर्देश

by nagesh
PM Narendra Modi | do not step on peoples earning prime minister narendra modis appeal states

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Good Governance | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपरिषदसोबत पाच चिंतन शिबिरांचा समारोप केला. हे सत्र चार तासांपेक्षा जास्त काळ सुरू होते, ज्या दरम्यान मंत्र्यांनी सादरीकरण केले आणि पीएम मोदी (PM Modi) यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. सूत्रांनी सांगितले की, 77 मंत्र्यांना आठ गटांमध्ये विभागण्यात (Good Governance) आले, ज्यामध्ये प्रत्येकासाठी एक समन्वयक निवडण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

बैठकीला ’चिंतन शिबिर’ म्हणण्यात आले, जे कार्यदक्षता आणि शासन-प्रशासनात एकुणच सुधारणांसाठी एक चिंतन सत्र होते. अशी एकुण पाच सत्र आयोजित करण्यात आली.

व्यक्तीगत दक्षता, केंद्रित अंमलबजावणी, मंत्रालयाचे कामकाज आणि हितचिंतकांशी समन्वय, पक्ष समन्वय आणि प्रभावी संचार वर एक-एक आणि अंतिम संसदीय पद्धतीवर सत्र आयोजित करण्यात आले होते.

 

एम. वेंकैया नायडू विशेष अतिथी

पहिल्या सत्रात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मनसुख मंडाविया यांनी व्यक्तीगत दक्षतेवर सादरीकरण दिले, दुसर्‍या सत्राचे नेतृत्व पीयूष गोयल आणि गजेंद्र शेखावत यांनी केले, सादरीकरण करणारे इतर मंत्री हरदीप सिंह पुरी (कार्य आणि हितचिंतक), अनुराग सिंह ठाकुर (पक्ष समन्वय आणि प्रभावी संचार) आणि प्रल्हाद जोशी (संसदीय कार्यमंत्री ) होते.

शेवटच्या बैठकीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा सभापती एम. वेंकय्या नायडू यांनाही विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. या सर्व बैठका प्रामुख्याने मोदी सरकारच्या दक्षता आणि वितरण प्रणालीत सुधारणा यावर केंद्रीत होत्या.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

स्मृती इराणी यांनी त्या गटाचे नेतृत्व सांभाळले जो सर्व मंत्रालयांची माहिती देईल.
मांडविया कार्यालय देखरेख प्रणालीवर लक्ष केंद्रित करतील आणि हरदीप पुरी लर्निंग ग्रुपचे नेतृत्व करतील.
अनुराग सिंह ठाकुर यांना त्या गटाचे नेतृत्व करण्याचे काम सोपवले आहे जो इतरांच्या कामाचे पुनरावलोकन करेल,
पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, नरेंद्र सिंह तोमर आणि प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वात अनेक इतर गट बनवले आहेत.

प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालयात एक पोर्टल विकसित करायचे आहे जे केंद्राच्या प्रमुख योजना आणि धोरणांवर अपडेट देत राहील.

संबंधित मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या देखरेखीसाठी एक डॅशबोर्ड आणि बैठका ठरवणे आणि पत्र व्यवहाराच्या
व्यवस्थापनासाठी एक प्रणाली या गटांना सोपवण्यात (Good Governance) आलेल्या कामांपैकी एक आहे.

मंत्र्यांना सर्व जिल्हे, राज्य आणि मंत्रालयांचे प्रोफाईल बनवणे आणि हितचिंतकांचे कार्यक्रम विकसित करण्यासाठी सुद्धा सांगण्यात आले आहे.

गटांमधील एकाला संशोधन, संचार आणि इतर प्रमुख क्षेत्रांवर नियंत्रणासह किमान तीन तरुण व्यावसायिकांची एक
टीम बनवण्यासाठी एक तंत्र स्थापन करण्याचे काम सुद्धा सोपवले (Good Governance) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

मोदी सरकार 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच कामाला लागल्याचे एकुणच या धोरणावरून
दिसते. दरमयान, या बैठका त्या मंत्र्यांसाठी महत्वाच्या आहेत, ज्यांना कॅबिनेटमधील फेरबदलानंतर सरकारमध्ये आणण्यात आले होते.

संसदेच्या मागील मान्सून सत्रात, पीएम मोदी यांनी पहिल्यांदा मंत्र्यांना राज्यसभेत वेळ घालवण्यास आणि चर्चा शिकून घेण्यास सांगितले होते.
मोदींनी आपल्या कॅबिनेट सहकार्‍यांना मीडियासोबत बोलण्यावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा कामावर लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.

 

Web Title: Good Governance | 77 ministers divided into 8 groups to develop technology based resources under new plan to revamp governance

 

हे देखील वाचा :

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम देतीय 15 लाख रुपये कमावण्याची संधी ! जाणून घ्या किती गुंतवणुकीवर मिळू शकतो लाभ

PMSMY | मोदी सरकारची खास योजना ! रोज 2 रुपये गुंतवा अन् वृद्धापकाळात मिळवा 36 हजारांची पेन्शन, जाणून घ्या

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी, कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

Related Posts