IMPIMP

Eknath Shinde-Samrudhi Highway | जय महाराष्ट्र ! हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून एकनाथ शिंदेंनी चालवली 137 किमी वेगाने इलेक्ट्रिक कार; ट्विट करत म्हणाले… (Video)

by nagesh
Eknath Shinde-Samrudhi Highway | Shivsena minister eknath shinde drive an electric car at a speed of 137 kmph on samrudhi highway Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Eknath Shinde-Samrudhi Highway | शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg) नागपुर ते शिर्डी (Nagpur to Shirdi) हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार आहे. तसेच या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई (Nagpur to Mumbai) अंतर केवळ 6 ते 7 तासांवर येणार आहे. विदर्भातील उद्योग धंद्यांसह विकासाच्या विविध बाबींना चालनाही मिळणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. दरम्यान, वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा (Arvi Toll Plaza) येथे एकनाथ शिंदे यांनी ताशी 137 किमी वेगाने स्वत: इलेक्ट्रिक कार (Electric Car) चालवत रस्त्याची पाहणी केली. (Eknath Shinde-Samrudhi Highway)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे समृद्धी महामार्ग त्याचबरोबर पुलगाव नजदीक वन्यप्राण्यांच्या आवागमणासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणपूलाची पाहणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde-Samrudhi Highway) यांनी आज (सोमवारी) केली.
या महामार्गाचे वैशिष्ट्य असलेल्या वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी या महामार्गावर विषेश काळजी घेण्यात आलेली आहे.
वन्यजीवांना एकीकडून दुसरीकडे जाताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी खास 8 ओव्हरपास आणि 76 अंडरपास तयार केलेय.

 

 

दरम्यान, मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गाची वर्धा जिल्ह्यातील लांबी 58 किलोमिटर इतकी आहे. तेथील मार्ग पूर्ण बांधून झाला आहे.
रस्त्याची रुंदी 120 मीटर असून तो सहापदरी आहे. वर्धा, सेलु (Selu) आणि आर्वी (Arvi) या 3 तालुक्यातील 34 गावांमधून एकूण 782 हेक्टर इतकी जमीन महामार्गासाठी संपादीत केली गेलीय.
या जिल्ह्यात मार्गावर दोन हजार 762 कोटी रुपयांचा खर्च केला गेला.
या मार्गावर विनाअडथळा वाहतुकीसाठी 5 मोठे, 27 लहान पुलांसह 9 उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची जबाबदारी जेव्हा माझा खांद्यावर आली,
तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या विकासातील हा ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक शिवधनुष्य हाती घेण्याइतकेच आव्हानात्मक वाटत होते.
परंतु सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी समाजोपयोगी, विकासात्मक काम करण्याची माझी कायम मनिषा होती.
यातील एक भाग म्हणून मी नेहमी या प्रकल्पाकडे पाहतो आणि तो यशस्वीपणे उभारणे हे माझे उद्दिष्ट आहे.”

 

तसेच, ”हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या पाहणी दौऱ्या दरम्यान आज खास आग्रहास्तव बऱ्याच वर्षांनी चारचाकी वाहनाचे सारथ्य करण्याची संधी मिळाली.
इलेक्ट्रिक कार या महामार्गाच्या पूर्ण झालेल्या रस्त्यावरून चालवत असताना भविष्यात बदलणाऱ्या समृद्ध महाराष्ट्राचे चित्र डोळ्यांपुढे उभे राहिले आणि कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने मन सुखावले.” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

 

Web Title :- Eknath Shinde-Samrudhi Highway | Shivsena minister eknath shinde drive an electric car at a speed of 137 kmph on samrudhi highway Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil On Mahavikas Aghadi Govt | चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा; म्हणाले – ‘महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्या’

Petrol Diesel Price Hike Pune | सलग पाचव्या दिवशी पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच; जाणून घ्या नवे दर

Gold Silver Price Today | सोने-चांदीच्या दरवाढीला अखेर ‘ब्रेक’, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

 

Related Posts