IMPIMP

बंद होणार Employee Pension Scheme ? रू. 15000 पेक्षा जास्त बेसिक सॅलरीवाल्यांसाठी ‘न्यू पेन्शन स्कीम’ येणार, 12 मार्चला निर्णय

by nagesh
NPS Or EPF Which Is Better | nps or epf which is better for your retirement planning

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाEmployee Pension Scheme | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी संबंधित एक मोठी बातमी आहे. पुढील महिन्यात 12 मार्च रोजी होणार्‍या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी – CBT च्या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. EPFO सदस्यांना न्यू पेन्शन स्कीमची भेट मिळू शकते. ईपीएस – एम्ल्पॉई पेन्शन स्कीम अंतर्गत कमी पेन्शनबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यानंतर आता संघटना नवीन फिक्स्ड पेन्शन योजना आणण्याच्या विचारात आहे. (Employee Pension Scheme)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नवीन पेन्शन योजनेत (New Pension Scheme), ग्राहकाला फिक्स्ड पेन्शन रक्कम निवडण्याचा पर्याय मिळेल.

स्वयंरोजगार आणि खाजगी कमचार्‍यांनाही यामध्ये नोंदणी करता येणार आहे. वेतन आणि उर्वरित सेवा कालावधीच्या आधारावर पेन्शनची रक्कम देखील निश्चित केली जाईल. जे या पेन्शन योजनेची निवड करतील त्यांना कर्मचारी पेन्शन योजनेतून (EPS) वगळण्यात येईल.

 

15,000 पेक्षा जास्त मूळ वेतन असलेल्यांना मिळेल लाभ

Central board of Trustee ची बैठक 12 मार्च रोजी गुवाहाटी येथे होणार आहे.
यामध्ये नव्या पेन्शन योजनेवर चर्चा होणार आहे. मात्र, ही नवी पेन्शन योजना सर्वांसाठी असणार नाही.
यामध्ये 15,000 पेक्षा जास्त मूळ वेतन असलेल्यांचा समावेश केला जाईल. त्यांच्यासाठी ते ऐच्छिकही असू शकते.

 

सूत्रांनुसार, ईपीएफओ जास्त योगदानवर जास्त पेन्शनच्या मागणीनंतर हा पर्याय आणत आहे.
सीबीटीच्या बैठकीत, 15,000 रुपयांपेक्षा जास्त मूळ वेतन असलेल्या कर्मचार्‍यांसाठी आणि कर्मचारी पेन्शन योजना 1995 (EPS – 95) मध्ये अनिवार्यपणे समाविष्ट नसलेल्या कर्मचार्‍यांसाठी यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. (Employee Pension Scheme)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जास्त पेन्शनचा लाभ देण्याचा मिळेल पर्याय

सूत्रांनुसार, EPFO च्या नवीन फिक्स्ड पेन्शन योजनेची रक्कम दिलेल्या योगदानानुसार ठरवली जाईल.
तुम्हाला हव्या असलेल्या पेन्शननुसार योगदान द्यावे लागेल.

 

Web Title :- Employee Pension Scheme | employee pension scheme epfo to give new pension scheme option to its subscribers cbt 12th march meeting latest update

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत टोळी जेरबंद ! दरोड्यानंतर ओळख लपविण्यासाठी ठेवले होते सोबत दुसरे कपडे

Pune Crime | शौचालयाच्या टाकीत गुदमरुन चौघांचा मृत्यु; घरमालक भीमाजी काळभोरविरुद्ध गुन्हा दाखल

PMRDA-Illegal Constructions-Gunthewari | पीएमआरडीएच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे गुंठेवारी अंतर्गत नियमीत होणार ! 31 मे पर्यंत प्रस्ताव दाखल करण्याचे पीएमआरडीएचे आवाहन

 

Related Posts