IMPIMP

EPFO Facility | पीएफ अकाऊंटमधून विम्याचा हप्ता देखील भरता येतो, जाणून घ्या ‘ईपीएफओ’च्या सुविधेबाबत

by nagesh
EPFO Facility | epfo facility employee provident fund organization

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाEPFO Facility | कोरोना महामारीचा (Corona) सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून व्यवसाय ठप्प झाले आहेत. आर्थिक परिस्थिती गंभीर झाल्याने अनेकांना विमा पॉलिसीचे हप्ते (Insurance Policy Premiums) भरता आले नाहीत. अशा स्थितीत भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा असणाऱ्या रकमेचा वापर करुन एलआयसी पॉलिसीचे (LIC Policy) हप्ते भरणे शक्य आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही एक संघटना असून या संघटनेने सदस्यांना आर्थिक गरज असल्यास पीएफ मधून प्रीमियम भरण्याची सुविधा (EPFO Facility) दिली आहे. काही अटींची पूर्तता करुन तुम्ही पीएफ (PF) खात्यामधील रक्कम काढू शकता आणि एलआयसी प्रीमियम (LIC Premium) भरु शकता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

LIC चा प्रीमियम भरता येतो
तुम्हाला हे माहित असले पाहिजे की ईपीएफओने त्यांच्या ग्राहकांना किंवा खातेदारांना ही सुविधा (EPFO Facility) केवळ भारतीय जीवन विमा निगमच्या पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी दिली आहे. इतर कोणत्याही कंपनीच्या विमा पॉलिसीसाठी तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. या सुविधेचा प्रत्येक EPFO सदस्याला याचा लाभ मिळू शकत नाही. यासाठी पीएफ खातेधारकांना ईपीएफओकडे फॉर्म 14 (Form 14) सबमिट करावा लागेल. हा फॉर्म तुम्हाला ईपीएफओच्या वेबसाईटवर मिळेल.

 

फॉर्म 14 चा संबंध काय ?
पीएफ खातेदार ईपीएफओला त्याच्या एलआयसी पॉलिसीचा प्रीमियम भरण्यास सांगू शकतो, जरी त्यापूर्वी त्याला फॉर्म 14 भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल. याद्वारे जेव्हा तुमची एलआयसी पॉलिसी आणि ईपीएफओ खाते लिंक (Account Link) केले जाईल, तेव्हा पीएफ खात्यातून एलआयसी पॉलिसीचा प्रीमियम कापला जाईल.

 

ईपीएफओचे निमय
ईपीएफओकडून एलआयसी पॉलिसीचा प्रीमियम भरण्यासाठी एक अट अशी आहे की एलआयसीच्या दोन वर्षांच्या प्रिमियम एवढी रक्कम तुमच्या पीएफ खात्यात (PF Account) पडून आहे. यापेक्षा कमी रक्कम जर तुमच्या खात्यात जमा असेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रीमियमच्या कपातीच काय असेल वेळ
ज्यावेळी तुमच्या अर्जावर प्रक्रिया केली जाईल तेव्हा एलआयसी पॉलिसीचा प्रीमियम तुमच्या ईपीएफओ खात्यातून प्रीमियमच्या देय तारखेला किंवा त्यापूर्वी कापला जाईल.

 

Web Title :- EPFO Facility | epfo facility employee provident fund organization

 

हे देखील वाचा :

Nashik Crime | प्रेयसीने पेटवून दिलेल्या तरुणाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशीच मृत्यु; प्रचंड खळबळ

Aditya Thackeray | ‘सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस यांना वैफल्य आले’ – आदित्य ठाकरे

Modi Government | मोदी सरकारने आणखी 54 अ‍ॅप्सवर आणली बंदी, नवीन प्रतिबंधामध्ये चीनी अ‍ॅप्सचा सुद्धा समावेश

 

Related Posts