IMPIMP

Nashik Crime | प्रेयसीने पेटवून दिलेल्या तरुणाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशीच मृत्यु; प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | Chain Snatching In Vishrantwadi Chowk Yerwada Pune

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइनNashik Crime | लग्न जमविण्यात मोडता घालतो, म्हणून प्रेयसी व तिच्या कुटुंबियांनी पेट्रोल ओतून पेटवून दिलेल्या तरुणाचा उपचार सुरु असताना ‘व्हॅलेंटाईन डे’ (Valentine Day) दिवशी मृत्यु झाला (Nashik Crime). गोरख काशीनाथ बच्छाव Gorakh Kashinath Bachhav (वय ३१) असे या तरुणाचे नाव होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबतची माहिती अशी, नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) देवळा तालुक्यामधील लोहोनेर येथील दोघांचे प्रेम प्रकरण (Affair) होते. मात्र, त्यांच्या प्रेम प्रकरणाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. तिच्या घरचे लोक मुलीचे लग्न जमविण्यासाठी स्थळ पहात होते. मात्र, गोरखमुळे लग्न जुळून येत नव्हते, असे तिच्या घराच्यांचे म्हणणे होते. लग्न मोडल्याने त्यांनी गोरख याला ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बाजूला बोलावून घेतले होते. शुक्रवारी दुपारी (दि. 11) तो तेथे आला असताना त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा प्रेयसी व तिच्या घराच्यांनी त्याला लोखंडी सळईने मारहाण केली. त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले होते. त्यात गोरख ८५ टक्के भाजला होता. त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.
गोरखची मृत्युशी असलेली झुंज अपयशी ठरली़ उपचार सुरु असताना रात्री मृत्यु झाला. (Nashik Crime)

 

याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) प्रेयसी, तिची आई, वडिल, भावाला अटक केली आहे.

 

Web Title :- Nashik Crime | The young man who was set on fire by his girlfriend died on Valentine’s Day in nashik; Huge excitement

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | ‘सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस यांना वैफल्य आले’ – आदित्य ठाकरे

Modi Government | मोदी सरकारने आणखी 54 अ‍ॅप्सवर आणली बंदी, नवीन प्रतिबंधामध्ये चीनी अ‍ॅप्सचा सुद्धा समावेश

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; पाहा आजचा लेटेस्ट रेट

Gajanan Marne Gang | कुख्यात गजा मारणे टोळीतील गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून वर्षभरात 56 जणांवर MPDA

EPFO | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती ! ‘ईपीएफओ’कडून आता बेरोजगारांना संधी; तात्काळ करा नोंदणी, जाणून घ्या

 

Related Posts