IMPIMP

ERSS Police New Helpline Number | आता लवकरच 100 नाही तर 112 नंबरवर पोलिसांची मदत मिळणार

by nagesh
ERSS Police New Helpline Number | maharashtra pune 112 new police helpline number pune police tweets

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – ERSS Police New Helpline Number | पुणे शहरातील गुन्ह्यांची (Pune Crime) आणि अपघातांची (Accidents In Pune) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे पोलिसांकडून (Pune Police) एकमेव आपत्कालीन हेल्पलाईन जाहीर (Emergency Helpline Announced By Pune Police) करण्यात आली आहे. 112 ही नवी हेल्पलाईन (ERSS Police New Helpline Number) असणार आहे. केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) ही हेल्पलाइन येत्या काळात वापरली जाणार आहे. अशी माहिती पुणे पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

 

112 या एकाच हेल्पलाईनवर आता पुणेकरांना (Pune Police New Helpline Number) सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. पोलीस (Police), रुग्णवाहिका (Ambulance), अग्निशमन दल (Fire Brigade) आणि महिला हेल्पलाईन (Women’s Helpline) एकत्रित मदत उपलब्ध करुन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जीपीएसच्या (GPS) यंत्रणेच्या सहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोणत्या ठिकाणावरुन आला आहे, हे संबंधितांना समजणार आहे. (ERSS Police New Helpline Number)

पुणे पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘लक्षात ठेवा की लवकरच, एकच आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक ‘112’ असेल!’ इतर सर्व क्रमांक 100, 101 (अग्निशमन दल), 1091 (महिला हेल्पलाइन) यामध्ये एकत्रित केले जातील.

 

अशी मिळणार सेवा

112 हा आपत्कालीन नंबर अमेरिकेच्या (America) 911 या हेल्पलाईन नंबर सारखा असून इमरजेंसी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम Emergency Response Support System (ERSS) यांच्या अंतर्गत ही हेल्पलाईन सुरु केली जाणार आहे. याआधी आपल्याला पोलिसांची मदत हवी असेल तर 100 नंबर, महिला हेल्पलाईनसाठी 1091 आणि चाईल्ड हेल्पलाईनसाठी 1098 हे नंबर उपलब्ध होते. 112 या क्रमांकावर मदत मागितली तर घटनास्थळाजवळ गस्त घालणाऱ्या जीपीएस यंत्रणेवर त्याची माहिती जाईल. त्याद्वारे तक्रारदाराला तात्काळ मदत मिळेल.

 

पोलीस आणि नागरिकांच्या अडचणी दूर होतील

100 नंबर असताना पोलिसांना आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. कॉल नेमका कोणत्या तक्रारीसाठी आला? याबाबत अनेकदा शंका असायची. कधी तक्रारदार चुकीची माहिती देत होते. मात्र आता त्या अडचणीपासून नागरिक किंवा पोलिसांची सूटका होणार आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत मदत करणे शक्य होणार आहे.

Web Title : ERSS Police New Helpline Number | maharashtra pune 112 new police helpline number pune police tweets

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

PM Kisan | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM किसान योजनेचा 11 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार

Pune Crime | वखार महामंडळाचा विश्वासघात ! एकाचवेळी कायम आणि कंत्राटी कर्मचारी म्हणून हजेरीपत्रकात केल्या सह्या; स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Ajit Pawar On OBC Political Reservation In Maharashtra | ‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार” – अजित पवार

Related Posts