IMPIMP

Ganesh Bidkar | गणेेश बिडकर यांचा यापुढील पुणे महापालिकेच्या कामकाजातील नोंद ‘सभागृह नेता’ नव्हे तर भाजपचे ‘गटनेता’ म्हणून होणार

by nagesh
Ganesh Bidkar | Ganesh Bidkar will no longer be listed in the Pune Municipal Corporation as a House Leader but as a Group Leader of the BJP

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनस्वीकृत नगरसेवक असल्याने गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांचे सभागृह नेतेपद उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) रद्द केले आहे. त्यामुळे या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातून (Supreme Court) स्थगिती मिळत नाही तोपर्यंत बिडकर (Ganesh Bidkar) यांना यापुढे केवळ भाजपचा गटनेता (BJP Group Leader) म्हणूनच काम पाहावे लागणार आहे. विशेष असे की, सभागृह नेतेपदी (PMC House Leader) वर्णी लागल्यानंतर नदी सुधार, नदी काठ सुधार (Pune River Rejuvenation Project) आणि पीपीपी Purchasing power parity (PPP) तत्वावरील महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती देणार्‍या बिडकर (Ganesh Bidkar) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत ६ मार्चला होणार्‍या विविध प्रकल्पांचे उदघाटन आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमातही ‘गटनेता’ म्हणूनच नोंद राहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

डिसेंबर २०२० मध्ये भाजपने गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांची महापालिकेतील गटनेता (PMC House Leader Ganesh Bidkar) म्हणून नियुक्ती केली. महापौरांनी त्यांना सभागृह नेतेपदी नियुक्तीचे पत्र दिले. दरम्यान,बिडकर हे महापालिका निवडणुकीत (PMC Elections) पराभूत झालेले असून स्विकृत नगरसेवकाला सभागृहनेते पदी नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात कॉंग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर (Corporator Ravindra Dhangekar) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २८ फेब्रुवारीला या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने बिडकर यांचे सभागृह नेतेपद रद्दबादल ठरविले आहे (Ganesh Bidkar’s appointment as house leader in PMC cancelled by Bombay HC) . या निकालाची प्रत आज महापालिकेला (Pune Corporation) उपलब्ध झाली आहे.

 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेश बिडकर यांचे सभागृह नेतेपद रद्द झाले आहे.
परंतू सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालय यासंदर्भात कुठले आदेश देत नाही तोपर्यंत बिडकर यांना सभागृह नेते पदाचा अथवा नावाचा वापर करता येणार नाही.
मात्र, ते गटनेते म्हणून काम पाहू शकतील,
अशी माहिती महापालिकेच्या मुख्य विधि अधिकारी निशा चव्हाण यांनी दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

येत्या सहा मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचे अनावरण, मेट्रो मार्गिकेचे उदघाटन (Pune Metro),
नदी काठ आणि नदी सुधार प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच अटल बिहारी वैद्यकीय महाविद्यालय (Atal Bihari Vajpayee Medical College Pune ) आणि रुग्णालयाच्या मान्यतेचे पत्र देणार आहेत.
विशेष असे की नदी सुधार व नदी काठ सुधार या प्रकल्पांसाठी बिडकर यांनीही सभागृह नेता या नात्याने पाठपुरावा केला आहे.
परंतू या कार्यक्रमांतही त्यांची नोंद सभागृह नेत्याऐवजी भाजपचे गटनेते म्हणूनच होणार आहे.

 

उच्च न्यायालयाच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना गणेश बिडकर म्हणाले की,
न्यायालयाचा आदेश आज मिळाला. या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी दोन आठवड्यांची अर्थात १३ मार्च पर्यंत मुदत मिळाली असून मी अपिल करणार आहे. सभागृह नेता म्हणून कुठलाही निर्णय घेतला जात नाही आणि कोणत्याही समित्यांवर मी नाही.
अटल बिहारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ट्रस्ट आणि स्मार्ट सिटी कंपनीवर (Pune Smart City)
सभागृह नेता म्हणून संचालक म्हणून पद मिळाले आहे.
या दोन्ही ठिकाणच्या कामकाजात मी सहभागी होणार नाही.

– गणेश बिडकर, गटनेता, भाजपा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Ganesh Bidkar | Ganesh Bidkar will no longer be listed in the Pune Municipal Corporation as a House Leader but as a Group Leader of the BJP

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 15 हजाराची लाच घेताना ‘महावितरण’चा सहाय्यक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Arjun Khotkar | शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ, ED ने जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश

V. Muraleedharan | केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी घेतला केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला रुग्ण सहाय्यता कक्ष झाला हायटेक; रुग्णांची सर्व हिस्ट्री समजणार एका क्लिकवर; रुग्णांना जलद गतीने मिळणार मदत

 

Related Posts