IMPIMP

Arjun Khotkar | शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ, ED ने जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश

by nagesh
Arjun Khotkar | shiv sena leader arjun khotkar case ed orders to ban on sugar factories in jalna

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइनमनी लॉन्ड्रिंगच्या (Money Laundering) आरोपाखाली राष्ट्रवादीचे प्रवक्ते (NCP) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक (Arrest) केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकारमधील (Thackeray Government) मंत्री आणि आमदारांच्या मागे ईडीचा ससेमिरा आणखी वाढला आहे. शिवसेनेचे (Shivsena) नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर ईडीने पुन्हा एकदा कारवाई केली आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची मागील दोन महिन्यांपासून रामनगर साखर कारखाना (Ramnagar Sugar Factory) गैरव्यवहार प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. आज ईडीने रामनगर साखर कारखान्यावर निर्बंध (Restrictions) लावण्याचे आदेश दिले आहेत. जालना जिल्हाधिकारी (Jalna Collector) यांना पत्र लिहून निर्बंध लावण्याचे आदेश दिले आहे. या कारखान्याचा वापर विक्री आणि व्यवहार करण्यावर निर्बंध आणण्यात येणार आहेत. मागील काही दिवसांपासून ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यामुळे हा आदेश दिला आहे.

 

काय आहे प्रकरण ?
भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जालना येथील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचा (Scam) गंभीर आरोप केला.
सोमय्यांच्या या आरोपानंतर 26 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीचे एक पथक खोतकर यांच्या घरी दाखल झाले.
या पथकाने रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी खोतकर यांची कसून चौकशी केली.
विशेष म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी खोतकर यांची 12 तास चौकशी केली.
चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांचे समाधान झाले नसल्याने त्यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत (Jalna Krushi Utpanna Bazar Samiti) छापा टाकून कागदपत्रांची पडताळणी केली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

किरीट सोमय्या यांनी रामनगर कारखाना हा बेनामी खरेदी केल्याचा आरोप केला.
तसचे खोतकरांनी साखर कारखान्यात घोटाळा तर केलाच शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)
यांच्या कृपेने कारखान्याशी संबंधित 100 एकर सरकारी जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
खोतकरांना 100 एकर जागा बिल्डिंग (Building), मॉल्स (Malls), कमर्शियल कॉम्प्लेक्स (Commercial Complex) करण्यासाठी हवी आहे.
ही जागा कारखान्यासाठी दिली होती आणि याची किंमत 400 कोटी आहे.
शासकीय जमीन मिळून संपूर्ण जागा जवळपास 240 एकर असून याची किंमत 1 हजार कोटी इतकी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

 

Web Title :-  Arjun Khotkar | shiv sena leader arjun khotkar case ed orders to ban on sugar factories in jalna

 

हे देखील वाचा :

V. Muraleedharan | केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी घेतला केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला रुग्ण सहाय्यता कक्ष झाला हायटेक; रुग्णांची सर्व हिस्ट्री समजणार एका क्लिकवर; रुग्णांना जलद गतीने मिळणार मदत

Devendra Fadnavis | ‘अजित पवारांच्या शब्दाला कोणतीही किंमत राहिली नाही’ – देवेंद्र फडणवीस

 

Related Posts