IMPIMP

Ganeshotsav 2023 | गणेशमंडळांना मोठा दिलासा! चार फुटांवरील पीओपीच्या गणेशमूर्तींना परवानगी

by nagesh
Ganeshotsav 2023 | ganeshotsav 2023 ganesha idols of pop above four feet allowed exemption due to lack of guidelines on recommending alternatives to pop

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Ganeshotsav 2023 | गणेशोत्सवाच्या तयारीसाठी (Ganeshotsav 2023) मोठी तयारी सुरू आहे. गणेशोत्सवाला अवघे तीन महिने शिल्लक आहेत. तर दुसरीकडे गणेश मंडळांना पीओपीच्या नियमांबाबत (Rules of POP) मोठा दिलासा मिळाला आहे. 4 फुटांवरील मूर्तींसाठी (Idols On 4 Feet) पीओपीचा वापर करता येणार आहे. मात्र चार फुंटापेक्षा कमी उंची असणा-या मूर्तींसाठी शाडूची माती बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मूर्तिकार आणि मूर्ती विक्रेते-साठवणूकदारांना आजपासून ‘एक खिडकी’ पद्धतीने ऑनलाईन नोंदणीची (Online Registration) सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मुंबईतील (Mumbai News) गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) मंडळांवरील ‘पीओपी’ बंदीचा व्यत्यय यंदा किमान टळला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ला पर्याय सुचविणारी मार्गदर्शक तत्त्वे अद्याप जाहीर न केल्याने मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा चार फूट गणेशमूर्ती ‘पीओपी’ वापरता येणार आहे. मात्र, 4 फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती शाडूच्या मातीच्या असाव्यात. असे सांगितले. दरम्यान, गणेशोत्सव तोंडावर आला असून महापालिकेच्या परवानग्या मिळवण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे. यंदा महापालिकेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.

पीओपीच्या मूर्ती मुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते.
त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
त्यामुळे उंच गणेशमूर्ती बसविणाऱ्या मंडळांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,
‘पीओपी’ला पर्याय देण्याची मागणी मंडळांकडून होत आहे. तसेच,
मार्गदर्शक सुट्ट्या दिल्या तरी, घाई-घाईने निर्णयाची अंमलबजावणी करता येणार नाही, असे मूर्तिकारांचे (Sculpture) म्हणणे आहे.

Web Title : Ganeshotsav 2023 | ganeshotsav 2023 ganesha idols of pop above four feet
allowed exemption due to lack of guidelines on recommending alternatives to pop

Related Posts