IMPIMP

Two Cops Suspended In Pune | पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्याकडून 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई

by nagesh
Two Cops Suspended In Pune | Deputy Commissioner of Police Amol Zende suspended 2 policemen

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Two Cops Suspended In Pune | पतीपासुन विभक्त राहणार्‍या 24 वर्षीय महिलेस प्रेमाच्या जाळयात ओढून तिच्या मुलाचा सांभाळ करण्यासोबतच लग्नाचे आमिष दाखवुन (Lure Of Marriage) तिच्यावर बलात्कार करणार्‍या गुन्हे शाखेतील एका पोलिसास आणि त्याला सहकार्य करणार्‍या दुसर्‍या पोलिसावर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. (Two Cops Suspended In Pune)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलिस अंमलदार कादीर कलंदर शेख Police Qadir Qalandar Shaikh (बक्कल नं. 10743) आणि पोलिस अंमलदार समीर मजीदुल्ला पटेल
Sameer Majidullah Patel (बक्कल नं. 8409) अशी निलंबीत करण्यात आलेल्यांची नाव आहेत. कादीर शेख यांच्याविरूध्द बलात्कारासह (Rape In Pune) इतर कलमान्वये गुन्हा दाखल आहे तर समीर पटेल यांच्याविरूध्द पिडीतेस उलट-सुलट बोलवून धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. (Two Cops Suspended In Pune)

सर्वप्रथम सदरील गुन्हा लष्कर पोलिस ठाण्यात (Lashkar Police Station) नोंद झाला होता.
सीसीटीएनएसव्दारे तो मुंढवा पोलिस ठाण्यात (Mundhwa Police Station) वर्ग करण्यात आला होता.
दरम्यान, मुंढवा पोलिसांनी पोलिस अंमलदार कादीर शेख याला अटक देखील केलेली आहे.
न्यायालयाने त्याला दि. 7 जुलै पर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची चौकशी सुरू झाली आणि तात्काळ पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दोन्ही पोलिसांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. सदरील बलात्कार प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) करीत आहेत.

Web Title : Two Cops Suspended In Pune | Deputy Commissioner of Police Amol Zende suspended 2 policemen

Related Posts