IMPIMP

Genelia Riteish Deshmukh | रितेश देशमुख आणि जेनेलियाला बँकांकडून 116 कोटी रूपये कर्ज देण्यात ‘गडबड’ झाल्याचा आरोप, सरकारने दिले चौकशीचे आदेश

by nagesh
Genelia Riteish Deshmukh | riteish deshmukh and genelia under scanner over rs 116 crore loan issued by bank to their company government ordered an inquiry

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Genelia Riteish Deshmukh | बाॅलिवूडमधील सगळ्यात लाडकी आणि गुणी जोडी म्हणून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. आपल्या अभिनयातून मोठा चाहता वर्ग निर्माण करणारे हे देशमुख दाम्पत्य सध्या एका कारणामुळे चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता निर्णाण झाली आहे. बँकांकडून घेण्यात आलेल्या 116 कोटींच्या कर्जात अनियमितता केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत असून त्याबाबत सरकारकडून चौकशीचे आदेशच जारी करण्यात आलेले आहेत. देशमुखांकडून बॅंकेच्या व्यवहारात अनियमितता करत असल्याचा आरोप लातूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी गेल्या महिन्यात करत त्याबाबत चौकशीचा मागणी केली होती, त्यानुसार आता चौकशी करण्यात येत आहे. (Genelia Riteish Deshmukh)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या लातूर येथील कृषी प्रक्रिया कंपनीसाठी 116 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात सहकारी बँकांनी अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांनंतर आता या प्रकरणाबाबत जाणून घेण्यासाठी खोलवर चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. मागील महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात कृषी प्रक्रिया कंपनी देश अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडला त्यांच्या मूळ गावी लातूरमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (MIDC) भूखंड मिळाल्याचा सुद्दा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. (Genelia Riteish Deshmukh )

 

या प्रकरणाबाबत बोलताना महाराष्ट्राचे सहकार मंत्री अतुल सावे म्हणाले की, राज्यातील भाजपच्या नेत्यांनी थेट आरोप केला होता की कंपनीने 4 ऑक्टोबर 2021 रोजी पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता आणि बँकेने 27 ऑक्टोबर रोजी 4 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यासाठी मंजूरी सुद्धा मिळाली. त्यानंतर कंपनीने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता आणि 27 ऑक्टोबर रोजी बँकेकडून 61 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. बँकेकडून आणखी 55 कोटी रुपयांचे कर्ज 25 जुलै 2022 रोजी मंजूर करण्यात आले असल्याचे मंत्री सावे यांनी यावेळी सांगितले.

 

मंत्री सावे पुढे म्हणाले, बँकांकडून आवश्यक ते निकष न पाळता रितेश देशमुख यांच्या कंपनीला निधी मंजूर
केल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी पत्र लिहून हाच मुद्दा
उपस्थित केला होता. मला एमआयडीसीबद्दल काहीही माहिती नाही, पण बँकेकडून काही गैरव्यवहार झाला आहे का,
याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अतुल सावे म्हणतात, उपजिल्हा निबंधक निधीची छाननी करतील आणि कर्ज घेण्यासाठी आवश्यक असलेली
सुरक्षा सुनिश्चित केली गेली आहे की नाही हे शोधून काढेल. तपासात काही बेकायदेशीर काम झाले आहे का,
याचाही शोध घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे रितेश देशमुख हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि
काँग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. त्यांचा मोठा भाऊ अमित हे एमव्हीए सरकारमध्ये
मंत्री होते आणि त्यांचा लहान भाऊ देखील लातूर ग्रामीण मतदारसंघातून आमदार आहे त्यामुळे त्यांच्यावर
करण्यात आलेल्या आरोपांना गांभीर्याने घेत त्यावर चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत.

 

Web Title :- Genelia Riteish Deshmukh | riteish deshmukh and genelia under scanner over rs 116 crore loan issued by bank to their company government ordered an inquiry

 

हे देखील वाचा :

IPL Mini-Auction | IPLच्या लिलावात लागणार 1 हजारांपेक्षा जास्त खेळाडूंवर बोली; ‘या’ दोन देशांतील खेळाडू सर्वात जास्त

Mumbai Crime | अल्पवयीन मुलीवर वर्गमित्रांकडून लैंगिक अत्याचार, मुंबईतील मराठी शाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस

Restrictions In Mumbai | मुंबई पोलिसांकडून जमाबंदीचे आदेश जारी; 2 जानेवारीपर्यंत ‘कर्फ्यू’सारखी बंधनं, 5 हून अधिकजण एकत्र येण्यावर बंदी, जाणून घ्या संपूर्ण आदेश

 

Related Posts