IMPIMP

Restrictions In Mumbai | मुंबई पोलिसांकडून जमाबंदीचे आदेश जारी; 2 जानेवारीपर्यंत ‘कर्फ्यू’सारखी बंधनं, 5 हून अधिकजण एकत्र येण्यावर बंदी, जाणून घ्या संपूर्ण आदेश

by nagesh
Restrictions In Mumbai | curfew like restrictions in mumbai till january 2 ban on gathering of more than 5 people read full order

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Restrictions In Mumbai | शहरात शांतता सुनिश्चित करण्यासाठी, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखून सार्वजनिक सुव्यवस्थेत कोणत्याही प्रकारचे व्यत्यय येऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा मुंबई शहरात जमाबंदीचे (कलम १४४) आदेश लागू करण्यात आले असून सदर आदेश ४ डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत लागू करण्यात येणार असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत निर्णयाबाबचे एक प्रसिद्धीपत्रकच जारी करण्यात आलेले आहे. त्यामुळे या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची निदर्शने, घोषणाबाजी आणि कार्यक्रम करण्यास मनाई असणार आहे. या पार्श्वभूमीवर आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Restrictions In Mumbai)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात मुंबई पोलिसांच्या मिशन विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी म्हटले आहे की, शहरात २ जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारचा मेळावा, मिरवणूक, निदर्शने, लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. सदर जमावबंदी शांतता सुनिश्चित करण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्थेत कोणत्याही प्रकारचे व्यत्यय टाळण्यासाठी करण्यात आल्याचे म्हटले आहे. (Restrictions In Mumbai)

 

या आदेशानंतर सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची निदर्शने, घोषणाबाजी आणि कार्यक्रम करण्यास मनाई असणार आहे. मनोरंजनाच्या ठिकाणांभोवती मोठ्या प्रमाणात सामाजिक मेळावे करण्यात सुद्दा मनाई असेल, फटाके फोडणे, लाऊडस्पीकर वाजवणे, वाद्ये आणि बँड, घोषणाबाजी, प्रात्यक्षिके आणि सार्वजनिक ठिकाणी गाण्याचे प्रदर्शन, विवाह समारंभ, अंत्यसंस्कार याठिकाणी ५ किंवा त्याहून अधिक लोकांचे एकत्र येण्यास मनाई आहे.

 

तसेच कंपन्या, क्लब, सहकारी संस्था आणि इतर अशा संघटनांच्या मोठ्या प्रमाणावर बैठका यासह
सर्व प्रकारच्या मिरवणुका, सरकारी कार्यालये, न्यायालये आणि सरकारी किंवा निमशासकीय कामे करणाऱ्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आजूबाजूला, शैक्षणिक उपक्रम किंवा सामान्य व्यवसायिक शाळा,
महाविद्यालये आणि इतर संस्थांचे मोठे मेळावे या ठिकाणी सुद्दा सारखाच नियम लागू करण्यात आलेला आहे.

 

दरम्यान, 4 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत जास्तीत जास्त शहरात शस्त्रबंदी देखील लागू करण्यात आली
असून बंदुक, तलवारी आणि इतर अशा शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली असल्याचे सुद्धा प्रसिद्धीपत्रकात
नमूद करण्यात आलेले आहे. सदर आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईचे
मुंबई पोलिसांकडून संकेत देण्यात आलेले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Restrictions In Mumbai | curfew like restrictions in mumbai till january 2 ban on gathering of more than 5 people read full order

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | ‘पोलीस मला काही करु शकत नाहीत’ ! तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमियोवर FIR

BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ‘या’ माजी क्रिकेटपटूंची निवड

Gold Mines In Maharashtra | महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांत सोन्याच्या खाणी? जाणून घ्या ठिकाणं

 

Related Posts