IMPIMP

Gold Price Today | चांदीत मोठी घसरण, सोन्याचे दर पुन्हा उतरले; जाणून घ्या नवीन दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 19 january 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price Today) आठवड्याच्या दुसर्‍या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर 2021 ला घसरण नोंदली गेली. सध्या सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून 11 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. तर, चांदीच्या दरात (Silver) आज मोठी घसरण नोंदली गेली.

मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 45,134 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 59,534 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती.
अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या दरात घट (Gold Price Today) झाली, तर चांदीच्या दरात मोठा बदल झाला नाही.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सोन्याचा आजचा नवीन दर (Gold Price Today)

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात 54 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदली गेली.
दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 45,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
या स्तरावर खरेदी करणारे गुंतवणुकदार 2021 च्या अखेरपर्यंत एक मोठा नफा कमावू शकतात.
कारण, सध्या सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून 11,120 रुपये स्वस्त मिळत आहे.

सोने 11,120 रुपयांनी स्वस्त

सध्या सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून 11,120 रुपये स्वस्त मिळत आहे.
कारण ऑगस्ट 2020 मध्ये सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर पोहचले होते.
अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या किमतीत घट नोंदली गेली आणि ते 1,743 डॉलर प्रति औंसवर पोहचले.

 

चांदीचा आजचा नवीन दर (Silver Price Today)

चांदीच्या किमतीत सुद्धा आज घसरणीचा कल दिसून आला.
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचा दर 573 रुपयांच्या मोठ्या घसरणीसह 58,961 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि ती 22.37 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

सोन्यात का झाली घसरण

एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकन बाँडच्या यील्डमध्ये वाढ झाल्याने सोन्याची किंमत दबावात आली.
यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण नोंदली गेली.

तर, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये कमोडिटी रिसर्चचे व्हाईस प्रेसिडेंट नवनीत दमानी यांनी म्हटले की, डॉलरमध्ये मजबूती आणि यूएस ट्रेझरी यील्डमध्ये उसळीमुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे.

 

Web Title : Gold Price Today | gold price today declines and silver prices fell drastically check update prices

 

हे देखील वाचा :

Pune Court | कुरकुंभ MIDC परिसरामध्ये अमली पदार्थाची निमिर्ती केल्याप्रकरणी दोघांचा जामीन अर्ज दुसर्‍यांदा फेटाळला

Pune police | पोलिसांच्या स्पर्धेला रिक्षावाल्यांचे प्रत्युत्तर, पोलिसांसाठी आयोजित केली 1 कोटी बक्षिसांची स्पर्धा

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; दिलं ‘या’ दिग्गजांना आव्हान

 

Related Posts