IMPIMP

Gopichand Padalkar | भाजप आ. गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘महाभकास’ आघाडीने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेका घेतलाय’

by nagesh
Gopichand Padalkar | BJP leader and MLC gopichand padalkar slams maha vikas aghadi government over closing of schools in state

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून राज्यातील मागील काही दिवस सुरु असलेल्या पावसाच्या (Maharashtra Rains) संततधारेमुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. मात्र, या आस्मानी संकटावर सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. उलट त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा वीजबिले (Electricity bills) सक्तीने वसूल केली जात आहे. त्यांचे वीज कनेक्शन तोडली (Power outage) जात आहेत, असा निजामशाही कारभार महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) चालवला असल्याची टीका भाजप आमदार (BJP MLA) गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. तसेच या महाभकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा जणू ठेकाच घेतला असल्याची खोचक टीका गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) पुढे म्हणाले, मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. याचा फटका शेतीमालाला बसला आहे. शेतकऱ्यांवर ओढावलेल्या या आस्मानी संकटावर सरकारने (Maharashtra Government) कोणतीही मदत केलेली नाही. उलट सरकारी यंत्रणा पंचनामेही करण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्री वर्षाच्या बाहेर पडण्यास तयार नाहीत. पहिल्या पावसाला झालेल्या विलंबामुळे पेरणी उशीरा झाली. खरिपाचे पीक तोंडावर असताना वादळ आलं. यामुळे मुसळधार पावसाने (Heavy rain) सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या. कापणीला आलेले पीक पाण्यात सडलं. तरीही पीक विम्याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, असे पडळकर म्हणाले.

 

पंप नसणाऱ्यांनाही वीजबिल

दोन-चार वर्षामागील वीजबिलं आकारली जात आहेत. पंप नसणाऱ्यांनाही अव्वाच्या सव्वा वीजबिले आली असून यात अनेक त्रुटी आहेत. तीन एचपी धारकांना पाच एचपीचे बील, पाच एचपी धारकांना साडेसात एचपीचे बिल आणि साडेसात एचपी धारकांना दहा एचपीचे बील दिले आहे, या गोंधळामुळे शेतकरी हतबल झाल्याचे पडळकर म्हणाले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये

राज्यातील असंख्य शेतकऱ्यांनी पुराव्यानीशी वीजबिलासंदर्भातील भोंगळ कारभार उघड केला आहे.
त्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये.
ऐन कापणी हंगामात वीज कनेक्शन तोडणीमुळं झालेल्या नुकसानाचे पंचनामे आपण स्वत: करावे.
आपआपल्या कार्यक्षेत्रातील तहसीलदाराकडे ते सुपूर्द करून पोचपावती घ्यावी.
जेणेकरुन संपूर्ण नूकसानाची भरपाई मिळवण्यासाठी आपल्याला लढा उभारता येईल, असे आवाहन पडळकर यांनी केले.

 

Web Title :- Gopichand Padalkar | BJP MLA gopichand padalkar criticized on Maha Vikas Aghadi government on farming damage

 

हे देखील वाचा :

Rajesh Kale Solapur |’त्या’ प्रकरणात सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे 2 वर्षांसाठी तडीपार

Shilpa Shetty | ‘अक्कल’ बदाम नाही तर धोका खाऊन येते, ‘या’ व्यक्तीने दिला शिल्पा शेट्टीला सल्ला; पाहा व्हिडीओ

Dr. Suresh Jadhav | लस निर्मितीमध्ये महत्वाचं योगदान देणारे ‘सिरम’चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचे निधन

 

Related Posts