IMPIMP

Gunaratna Sadavarte-Pune Band | पुण्यातील मुक मोर्चावर गुणरत्न सदावर्तेंची वेगळीच मागणी, म्हणाले…

by nagesh
Adv. Gunaratna Sadavarte | gunaratna sadavarte lawyers charter revoked

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  Gunaratna Sadavarte-Pune Band | पुण्यात विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत ‘पुणे बंद मूक मोर्चा’ काढला आहे. मंगळवारी (दि. 13 डिसेंबर) पुणे शहर बंद ठेवण्यात आले. या बंदला नागरिकांकडून तसेच व्यापार्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला. जागोजागी पोलीस देखील तैनात होते. आता या बंद आणि मोर्चावर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील मूक मोर्चा हा बेकायदेशीर आहे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. (Gunaratna Sadavarte-Pune Band)

 

या मोर्चात भाजप उदयनराजे भोसले आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सहभागी झाल्या.
उदयनराजे भोसले यांना अटक करा अशी मागणी देखील सदावर्ते (Gunaratna Sadavarte-Pune Band)
यांनी केली आहे. पुण्यात पाळण्यात आलेला बंद आणि मुकमोर्चा बेकायदेशीर आहे असे म्हणत, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केली. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
बंद बेकायदेशीर आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा सांगूनही हा बंद पुकारण्यात आला.
या बंदमुळे कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय आला आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक केली जावी, असे सदावर्ते म्हणाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह
विधाने केल्याच्या निषेधार्थ पुण्यात आज (मंगळवारी) बंद पाळला जात आहे.
या बंदला अनेक संघटना, पक्ष आणि नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.

 

Web Title :- Gunaratna Sadavarte-Pune Band | gunaratna sadavarte demanded arrest bjp mp udayanraje bhosale regarding pune band

 

हे देखील वाचा :

Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत 16 महत्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणारा 28 वर्षीय तरुण गजाआड; आंबेगाव बुद्रुक येथील घटना

Dhule News | मस्करी जीवावर बेतली; गुदद्वारात प्रेशर पंपाने हवा भरल्याने तरूणाचा मृत्यू

 

Related Posts