IMPIMP

Dhule News | मस्करी जीवावर बेतली; गुदद्वारात प्रेशर पंपाने हवा भरल्याने तरूणाचा मृत्यू

by nagesh
Buldhana Crime News | 26 years old girl found dead after falling from moving train

धुळे : सरकारसत्ता ऑनलाईन – Dhule News | आपल्या मित्राची मस्करी करणे एका कर्मचाऱ्याला भलतेच महागात पडले आहे. कामावरून सुटताना कपडे साफ करायच्या प्रेशर पंपाचे नोझल मस्करीमध्ये एका कर्मचाऱ्याने त्याच्या सहकार्याच्या गुदद्वारात घालून चालू केले, त्यामुळे अंतर्भागात इजा होऊन त्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्हातील साक्री तालुक्यातील निजामपूर मधील ही घटना आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Dhule News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवार ११ डिसेंबरला दुपारी घडली. आरोपी आणि मृत्यू झालेला कर्मचारी हे दोघेही निजामपूरमधील एका खासगी कंपनीमध्ये काम करत होते. (Dhule News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कंपनी धातू कामाशी संबंधित सेवा पुरवते. या कंपनीतील कर्मचारी हे आपल्या कपड्यावर जमा झालेले धातुचे कण साफ करण्यासाठी हाय प्रेशर पंपचा वापर करतात.
रविवारी रोजच्याप्रमाणे कामावरून सुटी झाल्यानंतर कपड्यावर जमा झालेले धातूचे कण हटवण्याचं काम सुरू होत.
याचदरम्यान मस्करी करण्याच्या नादात आरोपीने आपल्याच कंपनीत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याला पकडले.
त्याने त्याच्या गुदद्वारामध्ये धातुचे कण साफ करणारा प्रेशन पंप घातला आणि सुरू केला.
त्यामुळे शरीरात अत्यंत जास्त दाबाने हवा गेल्याने त्या तरुणाच्या आतील अवयवांना इजा होऊन तो जखमी झाला.
सुरूवातीला त्याला नंदुरबार रुग्णालयात दाखल करण्यात आले,
त्यानंतर त्याला सूरतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

Web Title :- Dhule News | young man inserted a pressure pump in his colleagues private part in dhule

 

हे देखील वाचा :

Murder In Miraj | मिरजमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत पैलवानाचा खून

Khandala Ghat Accident-Anda Point | सहलीसाठी आलेल्या बसचा अपघात होऊन 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू; खंडाळा घाटातील घटना

Ajit Pawar | मराठवाड्यासह विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी हिवाळी अधिवेशनाचा कालवाधी 3 आठवडे करा; अजित पवारांची मागणी

 

Related Posts