IMPIMP

H3N2 Virus | राज्यात H3N2 चा धोका वाढला, पुन्हा निर्बंध लागणार? मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

by nagesh
 H3N2 Virus | 3 people died due to h3n2 virus chief minister shinde advised to use mask

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात कोरोनाची लाट (Corona Wave) ओसल्यानंतर राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले. कोरोनामुळे
विस्कळीत झालेले जनजिवन पुन्हा पूर्वपदावर येत असतानाच H3N2 संसर्गजन्य व्हायरसने (H3N2 Virus) डोकं वर काढलं आहे. मागील तीन दिवसांत
H3N2 व्हायरसमुळे (H3N2 Virus) राज्यात तीन जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
यांनी नुकतीच संसर्गजन्य H3N2 बाबात आढावा बैठक घेऊन नवे आदेश दिले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या संसर्गजन्य H3N2 च्या आढावी बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोविड/ H3N2 हे दोन्ही संसर्गजन्य (H3N2 Virus) असून दोन्हींची लक्षणे सारखी आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी कोविड काळात उभी करण्यात आलेली यंत्रणा ही पुन्हा अॅक्टीव्ह करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

याशिवाय गरोदर महिला, लहान मुलं, वृद्ध आणि आजारी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे.
तसेच सर्दी, खोकला यासारखी लक्षणं आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावी,
अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरण्याचे आवाहन करण्याबाबत सूचना देखील त्यांनी बैठकीत दिल्या आहेत.

 

दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 या व्हायरसमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील हा तिसरी बळी असून यापूर्वी अहमदनगर आणि नागपूर याठिका H3N2 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- H3N2 Virus | 3 people died due to h3n2 virus chief minister shinde advised to use mask

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis Bribery Case | अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करू पाहणार्‍या फरार जयसिंघानीचे राजकीय कनेक्शन आलं समोर, ‘या’ पक्षांकडून लढवली होती ‘ही’ निवडणूक

Khed Shivapur Toll Plaza | खेड-शिवापुर टोलनाक्यावर २ एप्रिलला सर्वपक्षीय एल्गार; सर्व मार्ग अवलंबून झाले आता टोलनाक्याच्या अंत्यविधी करणार – कृती समिती

 

Related Posts