IMPIMP

Har Har Mahadev | ‘हर हर महादेव’ चित्रपटाला राष्ट्रवादीचा विरोध, प्रेक्षकाला मारहाण केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर FIR

by nagesh
Jitendra Awhad | jitendra awhad stands on his comment about his shivaji maharaj controversial comment

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन  माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Former MP Sambhajiraje Chhatrapati) यांनी ‘हर हर महादेव’ (Har
Har Mahadev) आणि ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat) या मराठी चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे
आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awad) हे देखील आक्रमक झाले आहेत. या चित्रटांमध्ये शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची मोडतोड
केल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील एका मॉलमधील ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev)
या चित्रपटाचा शो बंद पाडला. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात (Vartaknagar Police Station) वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटाला विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवार रात्री 11 वाजता ठाण्यात आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना सिनेमागृहाच्या बाहेर जाण्याचे आवाहन केले. यानंतरही सिनेमागृहात बसलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंग घडले. याच कारणामुळे वर्तकनगर पोलीस ठाण्यात आयपीसी 141,143,146,149,323,504 या कलमांतर्गत आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

‘हर हर महादेव’ हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील (Chhatrapati Shivaji Maharaj) आधारित चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शीत झाला आहे. मात्र या चित्रपटाला आता विरोध केला जात आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये (Viviana Mall) जाऊन आंदोलन करुन शो बंद पाडला. यावेळी एका प्रेक्षकाने तिकिटाचे पैसे परत द्या आम्ही आमचा वेळ वाया घालवला आहे का, अशा शब्दात मॉल चालकाला सुनावले. यावेळी प्रेक्षकाची समजूत काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. मात्र, संतप्त झालेल्या प्रेक्षकाने त्यांचे ऐकले नाही. अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या प्रेक्षकाला मारहाण (Beating) केल्याची घटना घडली. याचा व्हिडिओ मनसे नेते अमेय खोपकर ( MNS Ameya Khopkar) यांनी ट्विट केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :-  Har Har Mahadev | case filed against ncp mla jitendra awhad and his workers thane closing har har mahadev film show

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बांधकाम व्यावसायिक काकडे यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, काकडेंनी दाखल केला त्याच्यावर खंडणीचा गुन्हा

T20 World Cup 2022 | विराट कोहलीने पहिल्यांदाच पटकावला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार

Pune Crime | हडपसर परिसरातील कल्याण मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 20 जणांवर कारवाई

 

Related Posts