IMPIMP

Pune Crime | हडपसर परिसरातील कल्याण मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 20 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Police Crime Branch News | Social Security Cell Pune raid on gambling den in Bundagarden area, action taken against 8 persons

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीतील बेकायदेशीरपणे सुरु
असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर (Kalyan Matka Gambling Den) गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने
(Social Security Department) छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेऊन 1 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई
(Pune Crime) शनिवारी (दि.5) केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हडपसर हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पाळत ठेऊन छापा टाकला असता काही जण पैशांवर कल्याण जुगार खेळताना आणि खळवत होते. पोलिसांनी 19 जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम 31,410 रुपये 70 हजार रुपये किमतीचे 15 मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 1 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

याप्रकरणी 20 जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत
(Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या 19 जणांना पुढील कारवाईसाठी हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale)
, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक
सुरक्षा विभागाच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Crime branch raids Kalyan Matka gambling den in Hadapsar police station limits, action against 20 people

 

हे देखील वाचा :

Abdul Sattar | टीकेनंतर अब्दुल सत्तार आपल्या वक्तव्यावर ठाम, सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना म्हणाले-‘मग त्यांना…’

Abdul Sattar | ‘माफी मागा नाहीतर..’ राष्ट्रवादीचा अब्दूल सत्तारांना 24 तासांचा अल्टिमेटम (व्हिडिओ)

 

Related Posts