IMPIMP

Pune Crime | बांधकाम व्यावसायिक काकडे यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, काकडेंनी दाखल केला त्याच्यावर खंडणीचा गुन्हा

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणेसरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | दुकानाचा भाडेकरार संपत असताना डिपॉझिट घेऊन भाडेकरार वाढवून न देता दुसर्‍याला दुकान दिले. त्याबाबत विचारणा केली असताना जातीवाचक शिवीगाळ करुन दोन मिनिटेही लागणार नाही तुला संपवून टाकायला अशी जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देणार्‍या बांधकाम व्यावसायिक काकडे यांच्यावर पोलिसांनी (Pune Police) अ‍ॅट्रोसिटीचा (Atrocity Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मालोजीराव रंगराव काकडे Malojirao Rangrao Kakade (रा. गंगाधाम, गुलटेकडी) व त्यांच्या २ सहकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात काकडे यांनी खंडणी (Ransom Case) मागितल्याची फिर्याद दिली आहे. हा प्रकार गुलटेकडी येथील सुमित प्लाझा (Sumit Plaza Gultekdi ) येथील कार्यालयात २९ ते ३० ऑक्टोबर दरम्यान घडला.

 

याबाबत विजय गायकवाड (Vijay Gaikwad) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २४१/२२) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी मालोजीराव काकडे यांच्याकडून भाडेतत्वावर दुकान
भाड्यावर घेतले होते. त्याची मुदत ३० ऑक्टोबरला संपत होती. भाडेकराराचे नुतनीकरण करण्यासाठी फिर्यादी
यांनी १ लाख १५ हजार रुपयांचे डिपॉझिट दिले. तेव्हा काकडे यांनी दोन दिवसात भाडेकरार करु, असे सांगून पेंटिगसाठी दुकानाची चावी घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी फिर्यादी हे दुकानात गेले असताना त्यांनी हे दुकान दुसर्‍यालाच भाड्याने दिल्याचे दिसून आले. तेव्हा ते काकडे यांच्याकडे गेले असताना त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन अपमानास्पद वागणूक दिली. “परत ऑफिसमध्ये आलास तर तुला जिवंत सोडणार नाही. तुझ्या विरोधातच मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला लावेल, मला काय हे नवीन आहे काय, माझ्या नादी कोणी लागत नाही,
तु शहाणा बन नाही तर दोन मिनिटेही लागणार नाही तुला संपवून टाकायला,” अशी जीवे मारण्याची धमकी देऊन
ऑफिसची चावी न देता त्यांना ऑफिसमधून हाकलून दिल्याने गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत मालोजी राव रंगराव काकडे (वय ५२, रा. गंगाधाम, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद
(गु. रजि. नं. २४२/२२) दिली आहे. त्यानुसार विजय महादेव गायकवाड (रा. भिमाले कॉम्प्लेक्स, मार्केटयार्ड)
यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय गायकवाड
यांना दिलेल्या ऑफिसचा भाडेकरार संपल्याने परत फिर्यादी यांनी भाड्याने दिले नाही.
फिर्यादी व त्यांचे मित्र अरविंद सोळंकी, अ‍ॅड. बाळासाहेब गायकवाड हे ऑफिसमध्ये बसले असताना गायकवाड
या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादी यांना २ लाख रुपयांची मागणी करुन पैसे दिले नाही तर तुमच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा
गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक संदे (Assistant Police Inspector Sande) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime | A case of atrocity was filed against builder Kakade, a case of extortion was filed by Kakade

 

हे देखील वाचा :

You Must Die | ‘अ परफेक्ट मर्डर’ च्या खेळात प्रेक्षकांना गुंतवून टाकण्यासाठी सौरभ गोखले सज्ज

T20 World Cup 2022 | विराट कोहलीने पहिल्यांदाच पटकावला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार

Pune Crime | हडपसर परिसरातील कल्याण मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 20 जणांवर कारवाई

 

Related Posts