IMPIMP

Hasan Mushrif ED Raid | ईडीच्या छापेमारीनंतर पहिल्यांदाच बोलले हसन मुश्रीफ; म्हणाले…

by nagesh
 Hasan Mushrif ED Raid | NCP leader hasan mushrif first reaction after ed raid on house in kagal

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Hasan Mushrif ED Raid | ईडीने आज दि. ११ राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागल येथील घरावर धाड टाकली आहे.  (Hasan Mushrif ED Raid) यासंदर्भात आता हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (Hasan Mushrif ED Raid)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, ‘मी कामानिमित्त बाहेरगावी असताना दूरध्वनीवरून मला याबाबतची माहिती मिळाली. माझा कारखाना, नातेवाईकांची घरं तपासण्याचे काम ईडीकडून सुरू आहे. माझ्यावरील ईडीच्या या कारवाई विरोधात कागल बंदची घोषणा कार्यकर्त्यांनी दिली असल्याचेही मला समजलं आहे. त्यामुळे माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे, की त्यांनी हा बंद मागे घ्यावा आणि शांतात राखावी, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही वर्तन कार्यकर्त्यांनी करू नये.’ असा सल्ला देखील त्यांनी आंदोलक कार्यकर्त्यांना दिला.

 

तसेच याप्रकरणी पुढे बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, ‘दीड दोन वर्षांपूर्वीदेखील ईडीने अशाच प्रकारे माझ्या घरांवर छापे टाकले होते. त्यात काहीही निष्पन्न झालं नव्हतं. मग आता पुन्हा कशासाठी छापेमारी करण्यात आली. याबाबत मला माहिती नाही. तसेच याबाबत सविस्तर माहिती घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देईन.’ असे देखील ते म्हणाले.

 

यावर अधिक बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, ‘चार दिवसांपूर्वी कागलमधील भाजपाचे नेते दिल्लीत जाऊन आले.
माझ्यावर कारवाई करावी, असे प्रयत्न त्यांनी केले. एकंदरीतच हे गलिच्छ राजकारण आहे.
राजकारणात अशा प्रकारे कारवाया होत असतील तर याचा निषेधच झाला पाहिजे.
नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई सुरू आहे.
किरीट सोमय्या म्हणतात, अस्लम शेख यांच्यावरही कारवाई होईल,
याचा अर्थ विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे.’ असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्यांवर टीका केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Hasan Mushrif ED Raid | NCP leader hasan mushrif first reaction after ed raid on house in kagal

 

हे देखील वाचा :

Nashik Police Car Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात, तीन पोलीस कर्मचारी जखमी

Maharashtra State Police Sports Competition-2023 | उंच उडी क्रीडा प्रकारात कोकण परिक्षेत्राच्या शितल पिंजारे यांचा नवा विक्रम

NCP Hasan Mushrif ED Raid | खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘हे ईडीचे सरकार, जे त्यांच्या विरोधात बोलतात त्यांच्यावर…’

 

Related Posts