IMPIMP

Nashik Police Car Accident | मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला भीषण अपघात, तीन पोलीस कर्मचारी जखमी

by nagesh
 Nashik Police Car Accident | strange accident involving a nashik police vehicle near gonde on the highway three policemen injured

नाशिक / इगतपुरी  : सरकारसत्ता ऑनलाईन   Nashik Police Car Accident | नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाताना पोलिसांच्या वाहनाला विचित्र अपघात झाला. या अपघातत तीन पोलीस जखमी (Policemen Injured) झाले आहे. हा अपघात मुंबई आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील (Gonde Dumala Industrial Estate) लिअर कंपनीजवळ झाला. हा अपघात (Nashik Police Car Accident) एवढा भीषण होता की यात पोलिसांच्या वाहनाने तीन पलट्या मारल्या. जखमींना उपचारासाठी वाडीवऱ्हे येथे दाखल करण्यात आले आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सचिन मंडलिक, रश्मी राजपूत गुन्ह्या प्रकरणी हायकोर्टात (High Court) एफिडेविट (Affidavit) सादर करण्यासाठी जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. तीन वाहनांचा हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात झाल्यानंतर अपघातातील एक वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला आहे. अपघातात नाशिक पोलीस दलातील संतोष भगवान सौंदाणे Santosh Bhagwan Saundane (वय-57), सचिन परमेश्वर सुक्ले Sachin Parmeshwar Sukle (वय-43), रविंद्र नारायन चौधरी Ravindra Narayan Chaudhary (वय-37) हे जखमी झाले आहेत.

 

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे निवृत्ती पाटील गुंड यांना अपघाताची माहिती
मिळताच त्यांनी तातडीने अपघात स्थळावर धाव घेतली.
जखमींना वाडीवऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
यात पोलिसांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच आणखी एका कारचे नुकसान झाले आहे.

 

 

Web Title :- Nashik Police Car Accident | strange accident involving a nashik police vehicle near gonde on the highway three policemen injured

 

हे देखील वाचा :

Maharashtra State Police Sports Competition-2023 | उंच उडी क्रीडा प्रकारात कोकण परिक्षेत्राच्या शितल पिंजारे यांचा नवा विक्रम

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा तपास यंत्रणांना सल्ला; म्हणाले…

NCP Hasan Mushrif ED Raid | खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘हे ईडीचे सरकार, जे त्यांच्या विरोधात बोलतात त्यांच्यावर…’

 

Related Posts