IMPIMP

HDFC, SBI Interest Rate | SBI, HDFC बँकेच्या ग्राहकांना आनंदाची बातमी, मिळणार मोठा फायदा

by nagesh
HDFC, SBI Interest Rate | good news for hdfc and sbi bank customers interest rates on fd increased know here new rates

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनHDFC, SBI Interest Rate | खासगी क्षेत्रातील अव्वल बँक असलेल्या एचडीएफसी आणि एसबीआय बँकेच्या ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे. एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) मुदत ठेवीवरील व्याजाचे दर (HDFC, SBI Interest Rate) वाढवले आहेत. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, दोन कोटींहून कमी रकमेच्या मुदत ठेवीवरील व्याजदर 5-10 बेसिस पॉईंटने (Basis Point) वाढवण्यात आले आहेत. 14 फेब्रुवारीपासून हे नवे व्याज दर लागू झाले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एचडीएफसी बँक ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षा पर्यंतच्या मुदत ठेवीची सुविधा देते. तसेच ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) मुदत ठेवीवर अधिक व्याजही देते. 7 ते 10 वर्षांसाठीच्या मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाचा दर (HDFC, SBI Interest Rate) 2.50 टक्के ते 5.60 टक्क्यांच्या दरम्यान आहे. तर ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवीवर मिळणारा व्याज दर 3 ते 6.35 टक्क्यांदरम्यान आहे.

 

कालावधी व्याज दर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर

7 – 14 दिवस 2.50% 3.00%
15 – 29 दिवस 2.50% 3.00%
30 – 45 दिवस 3.00% 3.50%
46 – 60 दिवस 3.00% 3.50%
61 – 90 दिवस 3.00% 3.50%
91 दिवस ते 6 महिने 3.50% 4.00%
6 महिने 1 दिवस ते 9 महिने 4.40% 4.90%
9 महिने 1 दिवस ते 1 वर्ष कमी 4.40% 4.90%
1 वर्ष 5.0% 5.50%
1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्ष 5.00% 5.50%
2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्ष 5.20% 5.70%
3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्ष 5.45% 5.90%
5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्ष 5.60% 6.35%

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयनं (SBI Bank) देखील 2 वर्षाहून अधिक कालावधीच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात 10 – 15 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. त्यानुसार 7 ते 10 वर्षांसाठीच्या मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजाचा दर 2.9 टक्के ते 5.5 टक्क्यांच्या दरम्यान असणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉईंट अतिरिक्त मिळतील. 15 फेब्रुवारी 2022 पासून हे दर लागू झाले आहेत.

 

Web Title :- HDFC, SBI Interest Rate | good news for hdfc and sbi bank customers interest rates on fd increased know here new rates

 

हे देखील वाचा :

How To Relieve Stress Quickly | चुटकीसरशी गायब करायचा असेल ‘स्ट्रेस’ तर जाणून घ्या तणाव दूर करण्याच्या 7 सोप्या पद्धती

Weight Loss Kadha | वजन कंट्रोल करण्यासाठी परिणामकारक आहे ‘हा’ एक काढा

Diabetes ची 4 सर्वात मोठी कारणे, ‘या’ वाईट सवयी आजच सोडा, जाणून घ्या कोणत्या

 

Related Posts