IMPIMP

Home Stay | ‘होम स्टे” बनला गावातील तरूणांचा रोजगाराचा मार्ग; जाणून घ्या ‘होम स्टे’ म्हणजे काय?

उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यात महिलांनी राबविला यशस्वी प्रयोग

by nagesh
Home Stay | home stay run by 30 women latest good news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Home Stay | रोजगाराच्या शोधात खेड्यातील तरूण शहरांकडे वळत आहेत. त्यामुळे अनेक खेडी जणू ओस पडू लागली आहेत. या समस्येचा गांभीर्याने विचार करून उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील लिती गावातील तीस महिलांनी “होम स्टे” हा एक आगळा वेगळा प्रयोग राबविला ज्याने गावचे नशीब तर पालटलेच परंतू गावातील तरूणांना रोजगाराचा नवा मार्ग देखील मिळाला. (Home Stay)

 

गावातील महिलांनी सांगितले की, सन 2018 पासून पर्यटकांसाठी होम स्टेचा प्रयोग करण्यात येत आहे ज्याला यश मिळत आहे. सर्वप्रथम सहा महिलांनी पुढे येऊन आपल्या बचत रकमेतून हे काम सुरू कले. जसं जसं त्यांना यश मिळत गेलं तसं तसं इतर महिलांनी देखील हे काम करायला सुरूवात केली. हा व्यवसाय करणार्या सर्व महिला मिळून मिसळून हे काम करत आहेत. गावातील लोक देखील एकमेकांना सहकार्य करत हा व्यवसाय करत आहेत. महिन्याला अंदाजे दहा पेक्षा जास्त पर्यटक गावात होम स्टे साठी येत आहेत. याचे यश पाहून आता उत्तराखंड सरकारने होम स्टेसाठी तीस लाखा पर्यंत कर्जाची योजना देखील आणली आहे. यात 50 टक्के अनुदान असते तर अन्य कर्जाच्या रकमेवर व्याजदरात सूट देण्यात येते. सन 2018 पासून अनेक तरूण गावाकडे आपल्या घरी परतले आहेत व हा व्यवसाय करत आहेत. कोरोना साथीत तर होम स्टे अशा लोकांसाठी एक वरदानच ठरले जे शहरापासून लांब निसर्गरम्य ठिकाणी जाऊ इच्छित होते. (Home Stay)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे ‘होम स्टे’?
होम स्टे म्हणजे गावात पर्यटकांसाठी घरीच राहण्याची सोय केली जाते.
त्यांना गावाकडील खाद्य पदार्थांची मेजवानी देण्यात येते. तसेच तेथील उत्सव, प्रथा, परंपरांची माहिती देण्यात येते.
या सर्वांचा आनंद पर्यटक तेथेच राहून घेऊ शकतात.

 

Web Title :- Home Stay | home stay run by 30 women latest good news

 

हे देखील वाचा :

LIC MCap | आता टॉप-10 कंपन्यांच्या यादीतून बाहेर फेकली गेली एलआयसी, इतके झाले मार्केट कॅप

How To Get Rid Of Periods Rash | पीरियड्सनंतर त्रस्त करत असतील पीरियड रॅश, तर जाणून घ्या कारणे आणि बचावाचे उपाय

Shahajibapu Patil | ‘काय दारु…काय चकणा.. समदं कसं ओके’, युवासेनेचा शहाजीबापूंना टोला

 

Related Posts