IMPIMP

How To Control Hypertension | हिवाळ्यात ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी डाएटमध्ये आहारात समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

by nagesh
How To Control Hypertension | hypertension add these foods in your diet to control high blood pressure in winter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था How To Control Hypertension | हिवाळा अल्हाददायक असला तरी या हंगामात अनेक आजार डोके वर काढतात. यामध्ये हृदरोग (Heart Disease) आणि ब्लड प्रेशर (Blood Pressure) इत्यादी सारख्या आजारांची विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात ब्लड प्रेशर नियंत्रणात (BP Control) ठेवण्यासाठी आहारात कोण-कोणत्या गोष्टींचा (Diet Plan For Hypertension) समावेश करावा ते जाणून घेवूयात. (How To Control Hypertension)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. मेथी (Fenugreek) –
मेथीमध्ये विरघळणारे फायबर (Fiber) असते. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. वास्तविक, मेथी ही अशी भाजी आहे ज्यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असल्याने रक्तदाबासाठी ती चांगले फूड ठरते. ही भाजी व्यवस्थित धुवून, शिजवून सेवन करा.

 

 

2. मुळा (Radish) –
मुळ्यामध्ये पोटॅशियम (Potassium) असते जे रक्तप्रवाह (Blood Circulation) नियंत्रित करते. त्यामुळे रक्तदाबाची पातळी स्थिर राहते. मुळा सलाड म्हणून खाऊ शकता.

 

 

3. पालक (Spinach) –
पालकामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि ल्युटीन असते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पालकाचे सेवन करा. (How To Control Hypertension)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

4. गाजर (Carrots) –
गाजरमध्ये असलेले पोटॅशियम रक्तवाहिन्या (Blood Vessels) आणि धमन्यांमधील (Arteries) ताण कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तदाबाची पातळी कमी होण्यास मदत होते. हे सोडियमचे दुष्परिणाम देखील कमी करते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते.

 

 

5. बीट (Beetroot) –
बीट हे बी व्हिटॅमिनचा समृद्ध स्रोत आहे जे नसांचे कार्य सुधारण्यास मदत करते. त्यात अँटिऑक्सिडंट असतात जे रक्तदाब (Blood Pressure) आणि कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) पातळी नियंत्रित ठेवतात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- How To Control Hypertension | hypertension add these foods in your diet to control high blood pressure in winter

 

हे देखील वाचा :

Jammu And Kashmir Encounter | जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये सुरक्षा दलांनी केला 3 दहशतवाद्यांचा खात्मा

NEET-PG OBC Reservations | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ! वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला मंजुरी; EWS 10 टक्के आरक्षणालाही ग्रीन सिग्नल

Pune Crime | कोल्हापूरच्या 26 वर्षीय तरुणीला अश्लिल मेसेज ! खडकी पोलिसांकडून वाकडमधील जीम ट्रेनर गजाआड

 

Related Posts