IMPIMP

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे पुणे, नाशिक विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश; म्हणाले – ‘निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करा

by pranjalishirish
increase-covid-19-tests-effectively-enforce-restrictions-directs-chief-secretary-sitaram-kunte

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सीताराम कुंटे sitaram kunte यांनी राज्यातील जिल्हानिहाय आढावा घेतला. यावेळी त्यांनी चाचण्या वाढवून कंटेन्मेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणण्याचे निर्देश दिले. तसेच कोरोना निर्बंधाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा अतिरेक करून नये, अशा सूचना दिल्या आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सीताराम कुंटे sitaram kunte यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशी संवाद साधून आढावा घेतला. आज त्यांनी पुणे आणि नाशिक विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी उपस्थित होते.

सीताराम कुंटे sitaram kunte  म्हणाले, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही जिल्ह्यामध्ये जास्त आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह दर जास्त असल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधाची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच चाचण्यांची संख्या वाढवावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना याचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना दिल्या.

सध्या राज्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. त्याला गती द्या. ज्या जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे, त्या ठिकाणी लसीकरण वाढवा. यासाठी अतिरिक्त साठा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण मोहीम राबवण्यात यावी. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेटी देऊन आढावा घ्यावा आणि अहवाल सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.

कोरोना नियमांचे प्रभावी पालन करण्यासाठी मी जबाबदार ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा. याशिवाय कोरोना विरोधात कसे काम करायचे, याचा जिल्हा प्रशासनाला मागील एक वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मैदानात उतरून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन सीताराम कुंटे sitaram kunte यांनी केले.

Also Read : 

साखर कारखान्यातील अधिकार्‍याचा बेदम मारहाणीत मृत्यू, राष्ट्रवादीच्या माजी आमदारासह 19 जणांवर गुन्हा दाखल

Related Posts