IMPIMP

IND Vs PAK Cricket Series | भारत-पाकिस्तान सीरीजची योजना बनवत ‘हे’ क्रिकेट बोर्ड, चेयरमनने केला खुलासा

by nagesh
IND Vs PAK Cricket Series | dubai cricket council want to hosting bilateral series between india and pakistan

नवी दिल्ली : वृत्त संस्थाIND Vs PAK Cricket Series | भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) मध्ये आयसीसी सामन्यात टक्कर पहायला मिळाली. या दोन्ही टीम आपसात कोणतीही सीरीज खेळत नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) सातत्याने या प्रयत्नात असते की, काहीही करून ते बीसीसीआय (BCCI) ला त्यांच्यासोबत खेळण्यासाठी राजी करू शकतील. आयसीसी (ICC) मध्ये याबाबत त्यांनी अनेकदा विनंती केली. आता या दोन्ही टीममध्ये सीरीज घेण्याची योजना एका वेगळ्या क्रिकेट बोर्डने बनवली आहे. (IND Vs PAK Cricket Series)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दुबई क्रिकेट कौन्सिलचे चेयरमन अब्दुल रहमान फलकनाज (Abdul Rahman Falaknaj, chairman of the Dubai Cricket Council) यांनी
खलीज टाइम्स (Khaleej Times) ला सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना खेळवणे सर्वात चांगली गोष्ट आहे. जेव्हा काही वर्षांपूर्वी
शारजाह (Sharjah) मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये सामने खेळवले जात होते तेव्हा ते एखाद्या युद्धाप्रमाणे होत असत. परंतु ते जे युद्धा होत
असे ते चांगले होते, अतिशय उत्कृष्ट आणि खेळाच्या दृष्टीने शानदार होत असे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये 2012-13 मध्ये सीरीज खेळली (IND Vs PAK Cricket Series) गेली होती. भारताच्या दौर्‍यावर पाकिस्तानी टीमने टी20

आणि वनडे सीरीज खेळली होती. दोन टी20 मॅचची सीरीज 1-1 ने बरोबरीत राहिली होती, तर 3 मॅचच्या वनडे सीरीज 2-1 मधून पाकिस्तानच्या टीमच्या नावावर होती. यानंतर दोन्ही टीमने कोणतीही द्वीपक्षीय सीरीज खेळली नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

त्यांनी पुढे म्हटले, मला आठवते बालीवुड अभिनेता राज कपूर एकदा येथे आले होते त्यांनी माईक हातात घेऊन म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तानमध्ये शारजाहमध्ये अशाप्रकारच्या मॅचमध्ये टक्कर होणे किती कमाल होती. (IND Vs PAK Cricket Series)

क्रिकेट लोकांना जवळ आणते. क्रिकेट आपल्या सर्वांना सोबत ठेवते, असेच रहायला शिकवते, चला असेच ठेवूयात. तर ही एक गोष्ट आहे जी आपल्याला करायची आहे. जर आम्ही भारताला येथे येऊन पाकिस्तानविरूद्ध वर्षातून एकदा खेळाण्यासाठी राजी करू शकलो तर किती चांगले होईल.

Web Title : IND Vs PAK Cricket Series | dubai cricket council want to hosting bilateral series between india and pakistan

हे देखील वाचा :

WhatsApp Delta म्हणजे नेमकं काय? तुमच्या एका छोट्या चुकीमुळे WhatsApp होऊ शकते का बॅन; जाणून घ्या सत्य

Honeytrap Gang | हनीट्रॅपच्या माध्यमातून व्यावसायिकाला ब्लॅकमेल करणाऱ्या चौघांना अटक

Farmers Demand | सरकारच्या कल्याणकारी योजना अंमलात आणल्या तर गांजा लागवड थाबवू

Related Posts