IMPIMP

IND Vs PAK In T20 World Cup | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ खेळाडू ठरू शकतो भारताची डोकेदुखी, 12 मॅचमध्ये ठोकल्या 8 फिफ्टी

by nagesh
IND Vs PAK In T20 World Cup | team india will try to sent back pakistan batter rizwan early in t20 world cup match

सरकारसत्ता ऑनलाइन –  IND Vs PAK In T20 World Cup | 16 ऑक्टोबरपासून T-20 विश्वचषकाला (T-20 World Cup) सुरुवात होणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी भारताची पहिली लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) बरोबर होणार आहे. सध्याची पाकिस्तानची टीम भारतासमोर (India) तगडे आव्हान निर्माण करू शकते. भारताला या सामन्यात पाकिस्तानच्या एका खेळाडूपासून विशेष सावध राहावे लागणार आहे. हा खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा विकेटकिपर मोहम्मद रिझवान (Wicketkeeper Mohammad Rizwan) . रिझवान या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याला रोखणे भारतासाठी मोठे आव्हान असणार आहे. (IND Vs PAK In T20 World Cup)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

12 सामने 8 अर्धशतकं

 

मोहम्मद रिझवानने टी 20 क्रिकेटमध्ये (T-20 Cricket) यावर्षी धुराळा केला आहे. आशिया कपमध्ये (Asia Cup) भारताविरुद्धच्या दोन्ही सामन्यात रिझवाननं मोठ्या खेळी केल्या होत्या. सुपर फोरमध्ये त्याच्याच खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं भारतावर विजय मिळवला होता. त्यामुळे टी 20 वर्ल्डकपमध्ये त्याला रोखण्यासाठी भारताला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. रिझवानने गेल्या 12 सामन्यात तब्बल 8 अर्धशतकं ठोकली आहेत. रिझवान हा भारताविरुद्ध नेहमीच आक्रमकपणे खेळताना दिसतो.

 

 

2022 मध्ये रिझवानची कामगिरी

 

सामने – 14

धावा – 698

अर्धशतकं – 8

सरासरी – 63.45

स्ट्राईक रेट – 130.22

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- IND Vs PAK In T20 World Cup | team india will try to sent back pakistan batter rizwan early in t20 world cup match

 

हे देखील वाचा :

Jalna ACB Trap | वाळुची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाकडून 12 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Darryl Mitchell | न्यूझीलंड संघाला मोठा धक्का! ‘हा’ अष्टपैलू खेळाडू T-20 वर्ल्डकपमधून OUT

Nashik Aurangabad Road Accident | नाशिक नांदूरनाका अपघात ! मुख्यमंत्र्यांकडून तीव्र दुःख व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

 

Related Posts