IMPIMP

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! याच महिन्यापासून सुरु होणार बहुप्रतीक्षित सेवा, जाणून घ्या

by sikandershaikh
 Indian Railways | 78 day bonus announced railway employees 11 lakh 56 thousand people will benefit

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) indian railway | रेल्वेचा प्रवास अनेकवेळा कंटाळवाणा वाटत असतो. काही मोबाईलचे नेटवर्क तसेच इंटरनेटलाही व्यत्यय येत असतो. त्यामुळे अनेक दिवसापासून रेल्वे स्थानकात जसे वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याच पद्धतीने कंटेंट ऑन डिमांड (सीओडी) ही सेवा उपलब्ध करून देण्याची अनेक दिवसापासून मागणी होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून कंटेंट ऑन डिमांड ही सेवा या महिन्यापासून सुरू करण्याची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी नवीन सुविधा मिळणार असल्याचे गुरुवारी भारतीय रेल्वेचे पीएसयू रेलटेलच्या (RailTel) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

बफर फ्री स्ट्रीमिंग मिळणार

रेलटेलचे (indian railway) सीएमडी पुनीत पुनावाला म्हणाले की, रेल्वेत सुरु होणाऱ्या कंटेंट ऑन
डिमांड या सेवेअंतर्गत प्रवाशांना धावत्या रेल्वे प्रवासात त्यांच्या डिव्हाइसवर (मोबाइल किंवा अन्य
उपकरण) चित्रपट, बातम्या, म्युझिक व्हिडीओ असा प्रीलोडेड बहुभाषिक कंटेट उपलब्ध करुन दिला जाईल.
विशेष म्हणजे प्रवासात नेटवर्कमुळे स्ट्रीमिंग बफर होऊ नये यासाठी रेल्वेच्या डब्यात मीडिया सर्व्हर ठेवलं जाणार आहे.
त्यामुळे डिव्हाइसमध्ये हाय क्वालिटी बफर फ्री स्ट्रीमिंगची सेवा मिळेल.

कुठे होणार सुरू होणार हि सेवा

पश्चिम रेल्वेमार्गावर एका राजधानी एक्सप्रेस आणि एका एसी लोकलमध्ये ही सुविधा अंतिम टप्प्यात असून चाचणी सुरू आहे.
यातून मिळणारा महसूल रेल्वे आणि रेलटेलमध्ये ५०-५० टक्के वाटून घेणार आहेत तर पीएसयूला या प्रकल्पातून किमान ६० कोटी रुपयांच्या वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा आहे.
५ हजार ७२३ उपनगरी रेल्वेसह(लोकल) ८ हजार ७३१ ट्रेन आणि वाय-फाय असणाऱ्या ५ हजार ९५२ रेल्वे स्थानकांवर ही सेवा सुरू होणार आहे.

‘खंडणीखोरांना समर्पण कळालंच नाही, श्री राम सेवा काय कळणार !’

Related Posts