IMPIMP

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; एमईएस क्रिकेट क्लबचा विजयी षटकार, इऑन वॉरीयर्स संघाचा तिसरा विजय

by nagesh
 Indrani Balan Winter T-20 League | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; Winning performance of Puna Club, SK Dominators teams

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Indrani Balan Winter T-20 League | पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित दुसर्‍या
‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत एमईएस क्रिकेट क्लबने सहावा विजय मिळवत बाद फेरीकडे वाटचाल केली. इऑन
वॉरीयर्स संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला. (Indrani Balan Winter T-20 League)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अलम शेख याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इऑन वॉरीयर्स संघाने वालेकर स्पोर्ट्स संघाचा १० गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना वालेकर स्पोर्ट्स संघाचा डाव ९८ धावांवर गुंडाळण्यात आला. अविनाश चव्हाण (३० धावा) आणि कर्णधार विशाल गव्हाणे (२९ धावा) यांच्या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. अलम शेख याने १६ धावात ४ गडी टिपले. हे आव्हान इऑन वॉरीयर्सने ११ षटकात पूर्ण केले. पुरंजयसिंग राठोड याने ५८ धावांची तर, राजवर्धन उंड्रे याने ३१ धावांची खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला. (Indrani Balan Winter T-20 League)

 

Indrani Balan Winter T-20 League | 2nd Indrani Balan Winter T20 League Championship Cricket Tournament; MES Cricket Club's winning six, Eon Warriors' third win

 

गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर एमईएस क्रिकेट क्लबने क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस् संघाचा ९ गडी राखून सहज पराभव करत सहावा विजय नोंदविला. क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस् संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ६१ धावा धावफलकावर लावता आल्या. दिपक डांगी याने ४ धावात ३ गडी, गौरव जोत्शी याने ४ धावात २ गडी तर, वैभव गोसावी याने १३ धावात २ गडी टिपले आणि पठाणस् संघाचा डाव झटपट गुंडाळला. एमईएस क्रिकेट क्लबने ४.१ षटकात हे आव्हान पूर्ण करून झटपट विजय मिळवला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
वालेकर स्पोर्ट्सः १९ षटकात १० गडी बाद ९८ धावा (अविनाश चव्हाण ३०, विशाल गव्हाणे २९, अलम शेख ४-१६, स्वराज वाबळे २-२१) पराभूत वि. इऑन वॉरीयर्सः ११ षटकात बिनबाद १०० धावा (पुरंजयसिंग राठोड ५८ (४२, १० चौकार, १ षटकार), राजवर्धन उंड्रे ३१); सामनावीरः अलम शेख;

 

क्रिकेट अ‍ॅकॅडमी ऑफ पठाणस्ः १७.१ षटकात १० गडी बाद ६१ धावा (सुरज पवार १२, बलराम तापकिर १३, वैभव गोसावी २-१३, दिपक डांगी ३-४, गौरव जोत्शी २-४) पराभूत वि. एमईएस क्रिकेट क्लबः ४.१ षटकात १ गडी बाद ६५ धावा (आकाश जाधव नाबाद २१, अदवय सिधये नाबाद २६); सामनावीरः दिपक डांगी;

 

 

Web Title :- Indrani Balan Winter T-20 League | 2nd Indrani Balan Winter T20 League Championship Cricket Tournament; MES Cricket Club’s winning six, Eon Warriors’ third win

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यातील विजय काळोखेचा पानशेतजवळ खून, दोघांना अटक

Ashish Shelar | भाजप नेते आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर गंभीर टीका; म्हणाले – ‘याकूबची कबर आणि…’

Pune Crime News | पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

 

Related Posts