IMPIMP

Ashish Shelar | भाजप नेते आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर गंभीर टीका; म्हणाले – ‘याकूबची कबर आणि…’

by nagesh
BJP MLA Ashish Shelar | ashish shelar criticized uddhav thackeray on bmc fd issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  Ashish Shelar | मुंबईतील विविध विकासकामांच्या भूमीपुजनास तसेच लोकार्पण कार्यक्रमास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावर ठाकरे गटातील नेत्यांनी आम्ही कलेल्या कामाचेच लोकार्पण विद्यमान सरकार करत आहे. अशी टीका केली होती. या सगळ्यावर मुंबई भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्वीट करत जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आशिष शेलार यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, ‘आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन आणि लोकार्पण होतं आहे ही सगळी मुंबईकरांची स्वप्नपूर्ती आहे. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) तुमचा काय संबंध? असलाच तर विरोध करण्याएवढाच. म्हणून आज मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदाच्या क्षणात पण विरजण घालताय!’

 

 

तसेच आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार (Ashish Shelar) पुढे लिहितात, ‘याकूबची कबर सजविणे… मनसुख हिरेनची हत्या, दाऊदच्या मालमत्तांची खरेदी, बदल्यांमध्ये वसुली आणि सचिन वाझे… रस्त्यावर खड्डे, नाले सफाईत भ्रष्टाचार… कोविडमध्ये नातेवाईकांची भलामन… मेट्रो कारशेड रखडवणे… ही तुमच्या काळातील विकास कामे. याचं सगळं श्रेय निर्विवाद तुम्हालाच..!’ अशी टीका आशिष शेलार यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमीपूजन करणार आहेत, त्या योजना आमच्याच सरकारच्या काळात मंजूर करण्यात आल्या होत्या. तसेच या योजनांसाठी अर्थसंकल्पांत तरतूद करण्यात आली होती, नियोजन आराखडा तयार करण्यात आला, कायदेशीर अडथळे दूर करण्यात आले, त्याच सर्व प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी करीत आहेत आणि त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे.’ असा टोला शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच, पंतप्रधान मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी अवतरत आहेत हा प्रचार खोटा आहे.
ते त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी व मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवता येईल काय? या भविष्यातील विचाराने येत आहेत.
नव्हे, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच हेतूने मुंबईस बोलावले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन वगैरे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
अशी टीका ठाकरे गटातील नेत्यांकडून भाजप-शिंदे सरकारवर करण्यात आली होती.
त्यावर आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर चांगलीच टीका केली.

 

Web Title :- Ashish Shelar | bjp leader ashish shelar slams uddhav thackeray on yakub memon mansukh hiren case and various issues in past mva government

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Mahalunge MIDC Police Station | चाकणमधील औद्योगिकरणामुळे महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला गृह विभागाकडून मान्यता

Gold-Silver Rate Today | लग्नसराईच्या दिवसात थोडा दिलासा, सोन्याचे दर स्थिरावले, जाणून आजचा सोने-चांदीचा दर

 

Related Posts