IMPIMP

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाची विजयी सलामी; एमईएस क्रिकेट क्लब विजयाची हॅट्रीक

by nagesh
Indrani Balan Winter T20 League 2022 | Second 'Indrani Balan Winter T-20 League' Championship Cricket Tournament! Punit Balan Kedar Jadhav Cricket Academy team's winning opening; MES Cricket Club's hat-trick of victories

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Indrani Balan Winter T20 League 2022 | बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत एमईएस क्रिकेट क्लब संघाने सलग तिसरा विजय मिळवला. पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने विजयी सलामी देत शानदार सुरूवात केली. (Indrani Balan Winter T20 League 2022)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत जलदगती गोलंदाज वैभव गोसावी याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एमईएस क्रिकेट क्लबने इव्हनो इलेव्हन संघाचा १३१ धावांनी सहज पराभव करत विजयाची हॅट्रीक नोंदवली. पहिल्यांदा फलंदाजी करताना एमईएस क्रिकेट क्लबने १८ षटकात १८१ धावा धावफलकावर लावल्या. अजित गव्हाणे (४८ धावा), सुजित उबाळे (३० धावा) आणि सौरभ दोडके (३८ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. या आव्हानाला उत्तर देताना इव्हानो इलेव्हनचा डाव ५० धावांवर गडगडला. वैभव गोसावी याने १६ धावात ४ गडी बाद करून भेदक गोलंदाजी केली. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान वैभव यालाच मिळाला. (Indrani Balan Winter T20 League 2022)

 

अभिमन्यु जाधव याच्या ६५ धावांच्या जोरावर पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पुणे पोलिस संघाचा ३२ धावांनी पराभव करत स्पर्धेत शानदार सुरूवात केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीने २१४ धावांचा डोंगर उभा केला. अभिमन्यु जाधव याने ६५ धावांची खेळी केली. रोहीत करंजकर (४३ धावा) आणि मालोजी निगडे (नाबाद २३ धावा) यांनी छोट्या खेळी करून संघाला मोठी धावसंख्या रचण्यास मदत केली. या आव्हानाचा पाठलाग करताना पुणे पोलिसचा डाव १८२ धावांवर मर्यादित राहीला. अमित बोरडे (६१ धावा), विपुल गायकवाड (३९ धावा) आणि पृथ्वीराज गायकवाड (४९ धावा) यांन लक्ष्य साधण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण, ३२ धावांनी विजय संघापासून दूर राहीला.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

एमईएस क्रिकेट क्लबः १८ षटकात ८ गडी बाद १८१ धावा (अजित गव्हाणे ४८, सुजित उबाळे ३०, सौरभ दोडके ३८,
वैभव गोसावी नाबाद १०, सागर सिंग ३-२९, राकेश मते २-२५) वि.वि. इव्हानो इलेव्हनः १७ षटकात १० गडी बाद
५० धावा (सागर सिंग १३, राकेश मते १२, वैभव गोसावी ४-१६, गौरव जोत्शी ३-६); सामनावीरः वैभव गोसावी;

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद २१४ धावा (अभिमन्यु जाधव ६५
(३९, ७ चौकार), रोहीत करंजकर ४३, मालोजी निगडे नाबाद २३, अमोल पायगुडे ४-३५) वि.वि. पुणे पोलिसः
२० षटकात ९ गडी बाद १८२ धावा (अमित बोरडे ६१ (३९, ७ चौकार, ३ षटकार), विपुल गायकवाड ३९,
पृथ्वीराज गायकवाड ४९, गणेश मते ४-२२, अनिकेत इंद्रजीत २-२७); सामनावीरः अभिमन्यु जाधव;

 

Web Title :- Indrani Balan Winter T20 League 2022 | Second ‘Indrani Balan Winter T-20 League’ Championship Cricket Tournament! Punit Balan Kedar Jadhav Cricket Academy team’s winning opening; MES Cricket Club’s hat-trick of victories

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या अदर पुनावालांना 1 कोटीचा गंडा ! पुणे पोलिसांची धडक कारवाई; वेगवेगळ्या राज्यातून 7 जणांना अटक, आरोपींमध्ये सॉफ्टवेअर इंजीनियरचा समावेश

Ajit Pawar On CM Eknath Shinde Group | ‘कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देतात, शिंदे नेमका कुणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला जाताहेत? – अजित पवार

Yoga Guru Ramdev Baba | रामदेव बाबांचे विधान, म्हणाले – महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात

 

Related Posts