IMPIMP

INDW vs AUSW 2nd T20 | स्मृती मंधानाने रचला इतिहास; ही कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय खेळाडू

by nagesh
indw vs ausw 2nd t20 smriti mandhana has become the second indian woman player to complete 2500 runs in t20 international cricket

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : सध्या भारतामध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW 2nd T20) यांच्यात पाच सामन्यांची टी-20
मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर
काल पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला. या विजयाबरोबर टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी
बरोबरी साधली आहे. या सामन्यात स्मृती मंधानाने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. (INDW vs AUSW 2nd T20)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

स्मृती मंधानाच्या 2500 धावा पूर्ण
स्मृती मंधानाने भारतीय महिला संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2500 धावा केल्या आहेत. याअगोदर ही कामगिरी फक्त हरमनप्रीत कौरने केली होती. हरमनप्रीत कौरने आतापर्यंत 139 सामने खेळताना 125 डावांत 27.36 च्या सरासरीने 2736 धावा केल्या आहेत. मंधानाने तिच्या 104 व्या सामन्यातील 100 व्या डावात ही कामगिरी केली आहे. मंधानाने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2544 धावा केल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारतीय महिला संघाचा विजय
कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत 1 गडी गमावून 187 धावा केल्या होत्या. यानंतर भारतानेदेखील 20 षटकांत 5 विकेट गमावून 187 धावाच केल्या. यामुळे या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरनंतर लागला. सुपर ओव्हरमध्ये भारताने 4 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

 

Web Title :- indw vs ausw 2nd t20 smriti mandhana has become the second indian woman player to complete 2500 runs in t20 international cricket

 

हे देखील वाचा :

Shivsena | शिवसेनेच्या मूळ नावावर आणि पक्ष चिन्हावरील दाव्यासाठी निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय

Aurangabad Crime | नवविवाहित दाम्प्त्याची आत्महत्या; सिल्लोडमधील घटना

Pune News | लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त मोफत नेत्रचिकित्सा व शास्त्रक्रिया शिबीर संपन्न

 

 

Related Posts