IMPIMP

IPS Sanjay Pandey | ‘मुंबईतील नागरिक हे गुंडगिरीमुळे कमी अन्…’; पोलीस आयुक्त संजय पांडेंनी सांगितली मुंबईकरांची खरी समस्या !

by nagesh
CP Sanjay Pandey | mumbai police commissioner sanjay pandey declared dedicated police inspector for housing societies complaints at stations

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन IPS Sanjay Pandey | मुंबईतील लोक हे गुंडगिरीपेक्षा जास्त ध्वनी प्रदूषण, वाहतूक समस्या (Mumbai Traffic Problems) आणि ड्रग्जमुळे (Drugs) त्रस्त असल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितलं. क्लब प्रेस (Press Club) येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईकरांच्या समस्यांबाबत (IPS Sanjay Pandey) चर्चा केली. (CP Sanjay Pandey On Problem Of Mumbaikar)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मी जेव्हा पोलीस आयुक्तपदाचा (Mumbai Police Commissioner) कार्यभार स्वीकारला तेव्हा मला वाटलं की शहरात गुंडगिरी सर्वात मोठी समस्या असेल. यासाठी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या जनतेच्या प्रतिक्रिया घेतल्या. तेव्हा मला समजलं की गुंडगिरी नाही तर ध्वनी प्रदूषण (Noise pollution) मोठी समस्या आहे. या ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिकांना रात्री झोप येत नसल्याचं संजय पांडे (IPS Sanjay Pandey) यांनी सांगितलं.

 

हेड कॉन्स्टेबलसुद्धा करणार तपास –
कोणत्याही प्रकरणाचा तपास हा अधिकारी दर्जाचे लोकच करायचे, मात्र आता हेड कॉन्स्टेबलांनाही (Head Constable) छोट्या गुन्ह्याची जबाबदारी दिली जाणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पुर्ण होईल. पोलीस ठाण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या तुलनेत हेड कॉन्स्टेबलची संख्या जास्त असते, असं संजय पांडे म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, संजय पांडे यांनी सर्वांना एक मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबईमध्ये जवळपास 40 हजार इतकी हेड कॉन्स्टेबलची संख्या आहे.
दिवसातून कोणीही त्यांना चहा किंवा पाणी देण्याची मदत करा, म्हणजे एका दिवसात हजारो लोकांना पोलिसांची मदत होईल, असं संजय पांडे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- IPS Sanjay Pandey | mumbai police commissioner sanjay pandey discusses mumbaikar’s issues

 

हे देखील वाचा :

Pune Lohegaon International Airport | पुण्यातील लोहगाव विमानतळावर विमानाचा टायर फुटला, काही तासांसाठी विमानसेवा बंद

Jalgaon Crime | मारहाणीत कैद्याचा मृत्यू ! तुरुंग अधीक्षकांसह 4 रक्षकांवर खुनाचा FIR दाखल

High Blood Pressure | उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी अचूक औषध आहे ‘हे’ मिल्क प्रॉडक्ट, डेली डाएटमध्ये आवश्य करा समावेश; जाणून घ्या

 

Related Posts