IMPIMP

Italy Plane Crash | मोठी दुर्घटना ! विमानाची इमारतीला धडक; एका चिमुकल्यासह 8 जण ठार

by nagesh
Italy Plane Crash | italy plane crash building 8 dead

इटली : वृत्तसंस्था Italy Plane Crash | इटलीमधील मिलान शहरात एका लहान विमानाचा (Italy Plane Crash) भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एका लहान मुलासह 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू (Died) झाला आहे. धावपट्टीवर उतरण्याआधी हे विमान मिलान येथील दुमजली इमारतीला धडकल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. ही घटना रविवारी 3 ऑक्टोबर रोजी घडली आहे. विमान धडकल्याने त्या दुमजली इमारतीला आग (Fire) लागली आहे. तेथील वाहनांनीही पेट घेतला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याबाबत माहिती अशी, मिलानजवळील सान डोनाटो मिलानीज या लहान शहरात हा अपघात झाला आहे. विमान 2 मजली इमारतीला धडकल्यानंतर आग लागली. आगीमुळे निर्माण झालेले धुराचे लोळ काही किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. अपघातग्रस्त विमानाने मिलानच्या लिनेट विमानतळ आणि इटलीतील सारिदिनिया बेटादरम्यान उड्डाण घेतले होते. अशी माहिती एका वृत्तानूसार समजते.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे (Fire brigade) जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तर. या भीषण दुर्घटनेत विमानातील प्रवाशांशिवाय अन्य कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमान धडकलेली इमारत रिकामी होती. त्यामुळे सुदैवाने मोठ्या प्रमाणावरील जीवितहानी झाली नाही. मात्र, इमारत मेट्रो रेल्वे स्टेशन नजीक होते. त्याचबरोबर तेथील उभ्या असणाऱ्या वाहनांमध्ये चालक अथवा प्रवासी नव्हते. दरम्यान, या विमानातील प्रवासी फ्रान्सचे नागरिक असण्याची शक्यता आहे. विमानातील प्रवाशांशिवाय इतर कोणाचाही यामध्ये मृत्यू झालेला नसल्याची माहिती मिळत आहे.

Web Title :- Italy Plane Crash | italy plane crash building 8 dead

हे देखील वाचा :

Aryan Khan Drug Case | आर्यन खानच्या अडचणीत वाढ? मोबाईलमध्ये आक्षेपार्ह तपशील समोर

Vasai Virar News | वसईत 2 हजारच्या नोटांचा पाऊस…अन् गर्दीचा महापूर

Pune Crime | पुण्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने बेडरुमध्ये लावला कॅमेरा; समोर आली धक्कादायक माहिती

Related Posts