IMPIMP

Jalyukta Shivar Yojna | जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्ट अधिकारी, कंत्राटदारांवर महसुल विभागाची मोठी कारवाई

by nagesh
Maharashtra Political News | bjp leader devendra fadnavis reaction on cm eknath shinde upset uday samant

बीड : सरकारसत्ता ऑनलाईन – काही वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेतील (Jalyukta Shivar Yojna) घोटाळ्याचे लोण सबंध मराठवाड्यात पसरले होते. तसेच या प्रकरणी दोषी अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांच्यावर महसूल विभागाने कडक कारवाई केली होती. याप्रकरणी बीडच्या परळी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेतील (Jalyukta Shivar Yojna) गैरव्यवहारातील आरोपी असलेल्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी वसुलीची ४ कोटी रक्कम अद्यापपर्यंत भरली नाही. त्यामुळे महसुल विभागाने या प्रकरणी सर्व आरोपींना रक्कम भरण्याच्या नोटीसा काढल्या आहेत. तसेच ही रक्कम न भरल्यास त्यांच्या मालमत्तेवर महसुली बोजा चढवला जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपी असलेल्या अधिकारी आणि कंत्राटदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

 

सन २०१६-१७ या वर्षी बीडमधील परळी तालुक्यात जलयुक्त शिवार (Jalyukta Shivar Yojna) योजनेत घोटाळा झाल्याची बाब समोर आली होती. यात एकूण २४ अधिकारी, कर्मचारी व १२९ कंत्राटदारांना ४ कोटी ८३ हजार ३४७ रूपये भरण्याच्या सुचना महसुल विभागाने दिल्या होत्या. मात्र मागील चार वर्षात फक्त ४ कंत्राटदारांनी केवळ १ लाख ३४७ तर १६ अधिकाऱ्यांनी ४० लाख १७ हजार रूपये भरले आहेत. यासंबंधीच्या मोठ्या रकमा भरण्याची गती कमी असल्यामुळे त्यांना आता महसूल विभागाने नोटीशी बजावल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

परळी येथील जलयुक्त शिवार (Jalyukta Shivar Yojna) घोटाळा हा सबंध महाराष्ट्रभर गाजला होता.
त्यातच महसूल विभागांच्या या नोटीशींनी एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
या घोटाळ्यात परळी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील २४ पैकी १६ अधिकारी व कर्मचारी निलंबित
झाले होते. तर सात जण सेवानिवृत्त झाले आहेत. तसेच या प्रकरणी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची विभागीय पातळीवर चौकशी सुरू असून यात आरोपी असलेल्या १२९ कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले आहे.

 

Web Title :- Jalyukta Shivar Yojna | action by revenue department against jalyukta shivar yojana officers

 

हे देखील वाचा :

Budget 2023 | बजेटमध्ये नोकरदारांना मिळू शकते खुशखबर, होऊ शकते ही मोठी घोषणा

Nana Patekar | नाना पाटेकर यांचे बॉलिवूडमध्ये पुनरागमन; ज्याच्यावर केली टीका त्याच्याच चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

Pune Water Supply | गुरुवारी पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

 

Related Posts