IMPIMP

Nana Patekar | नाना पाटेकर यांचे बॉलिवूडमध्ये पुनरागमन; ज्याच्यावर केली टीका त्याच्याच चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका

by nagesh
Nana Patekar | nana patekar to join cast of the vaccine war director vivek agnihotri new movie

सरकारसत्ता ऑनलाईन  – Nana Patekar | दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटानंतर ‘द वॅक्सिंग वॉर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन येत आहेत. या सिनेमाचं चित्रीकरण सध्या लखनऊमध्ये सुरू आहे. ज्यावेळी संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात असताना, त्यावर उपाय शोधण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या संशोधकांवर आधारित हा चित्रपट आहे. (Nana Patekar)

 

या चित्रपटामध्ये अभिनेते नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आय.सी.एम.आर) माजी महासंचालक बलराम भार्गव यांची भूमिका नाना पाटेकर (Nana Patekar) साकारत आहेत. या अगोदर नानांनी 2018 मध्ये रजनीकांत यांच्याबरोबर काला हा चित्रपट केला होता. त्यानंतर ते हिंदी सिनेमापासून दूर गेले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आता ते 5 वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना या चित्रपटाची आणि त्यातील
त्यांच्या भूमिकेची उत्सुकता लागून राहिली आहे. भारत सरकारनं 2014 मध्ये, बलराम भार्गव यांना
त्यांच्या वैद्यकीय (कार्डिओलॉजी) क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. या चित्रपटाच्या माध्यमातून कोरोना काळात केलेल्या कार्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते अनुपम खेरसुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच पल्लवी जोशी, गोपाळ सिंग आणि दिव्या सेठ हे कलाकारसुद्धा या चित्रपटात असणार आहेत.

 

Web Title :- Nana Patekar | nana patekar to join cast of the vaccine war director vivek agnihotri new movie

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | गुरुवारी पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Maharashtra Politics | ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला ‘टकमक टोकाकडे’ घेऊन जात आहेत, या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ’

CM Eknath Shinde | छत्रपती संभाजी महारांबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरे गटाकडून अजित पवारांची पाठराखन; याबाबत मुख्यमंत्र्यांना सुनावत म्हणाले…

 

Related Posts