IMPIMP

Jayant Patil | ‘… तर पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल’ – जयंत पाटील

by nagesh
Jayant Patil '... Then it will get the status of a national party again' - Jayant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा (National Party Status) निवडणूक आयोगाने रद्द (Election
Commission) केला. यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत
पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया देत पक्षाची भूमिका मांडली आहे. यात त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये आमची कामगिरी सुधारुन राष्ट्रीय पक्षाचा
दर्जा पुन्हा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. जयंत पाटील (Jayant Patil) एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षाकडे राहू शकतो याचे काही निकष आहेत. गेल्या दोन वर्षात याबाबत सुनावणी झाली. यात आम्ही आमची बाजू मांडली होती. मात्र आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. या देशातील कोणते पक्ष राहू शकतात याविषयीच्या निकषात प्रत्येक निवडणुकीत काही बदल होत असतात. आगामी काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये आमची कामगिरी सरस, समाधानकारक झाली तर हा दर्जा पुन्हा मिळू शकतो. यात फार अडचण येईल असे वाटत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

 

निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय देशातील इतर पक्षांबाबतही घेतला आहे. यात जुना असलेल्या कम्युनिष्ट पक्षाचाही (Communist Party) समावेश आहे. निर्णयावर मतमतांतरे आहेत. मात्र आता निर्णय झाला आहे. यावर आमची केंद्रीय पक्ष समिती योग्य तो विचार करत आहे. आमच्या पक्षाचे केंद्रीय कार्यालय याबाबत माहिती घेऊन काम करत असल्याची माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली.

 

पक्षचिन्हाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, आमच्या पक्षाच्या चिन्हाला धक्का लागेल असे वाटत नाही. घड्याळ हे राष्ट्रवादीचे चिन्ह (Election Symbol) कायम राहील. याबाबत माझ्या मनात शंका नाही. महाराष्ट्रापुरता हा विषय बघितला, तर या चिन्हाला कोणताही धक्का लागत नाही असं दिसतं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा याची आम्हाला चिंता नाही. अन्य राज्यात निवडणुका झाल्यावर आमची परिस्थिती सुधारेल आणि पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

 

 

Web Title : Jayant Patil ‘… Then it will get the status of a national party again’ – Jayant Patil

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | ‘बाळासाहेबांचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी केली नव्हती’, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात; शिंदे गटाला दिलं थेट आव्हान

Best Govt Saving Schemes | जलद रिटर्न आणि टॅक्स बेनिफिट ! ‘या’ 5 सरकारी योजना आहेत बेस्ट! मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत लाभदायक

Jyotiba Phule Jayanti – Chandrakant Patil | महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

 

Related Posts