IMPIMP

Jica Project PMC | डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ‘जायका’ नदी सुधार प्रकल्पाला मान्यता ! पहिल्या आठवड्यात निविदा मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठविणार

by nagesh
PMC JICA Project | Mula Mutha river improvement project contract process completed MP Girish Bapat s follow up a great success

पुणे – सरकारसत्ता ऑनलाइन Jica Project PMC | जपानच्या जायका कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात येणार्‍या बहुचर्चित आणि प्रलंबित असलेल्या शहरातील मुळा-मुठा नदी सुधार योजनेच्या (Mula-Mutha Project) निविदा डिसेंबर महिन्यांच्या पहिल्या पंधरवड्यात मान्यतेसाठी येणार आहेत. दरम्यान, राज्य शासनानेही या योजनेसाठी केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधीचे परिणामकारक व्यवस्थापन करणे तसेच निधी विनियोगाची अंमलबजावणी करण्यासाठी एका नोडल एजन्सी म्हणून पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सह सचिवांची आज नियुक्ती केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

(Jica Project PMC) पुणे शहराच्या मध्यातून वाहणार्‍या मुळा मुठा नदीमध्ये शहरात गोळा होणारे मैलापाणी सोडण्यात येते. काही प्रमाणात पाण्यावर प्रक्रिया होत असली तरी वाढत्या शहरीकरणामुळे आजही नद्यांचे प्रदुषण मोठ्याप्रमाणावर होत आहे. या नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी  जपानच्या जायका कंपनीने (Jica Project PMC) केंद्र सरकारच्या माध्यमातून महपाालिकेला (Pune Corporation) सुमारे ८७५ कोटी रुपये अनुदान देणार आहे. सुमारे पाच वर्षांपासून विविध कारणास्तव आरोपांच्या फैरीत अडकलेल्या या प्रकल्पाची नुकतेच निविदा काढण्यात आली आहे. विलंबामुळे या प्रकल्पाचा खर्च चौदाशे कोटी रुपयांच्या पुढे गेला असून वरिल खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.

 

दरम्यान, सुमारे तीन महिन्यांपुर्वी या प्रकल्पासाठी निविदा आल्या आहेत. या निविदांची तांत्रिक तपासणी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या
निविदा मान्यतेसाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत. यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत केंद्र
शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर त्या स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येतील, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

नदी सुधार योजनेअंतर्गत ११ मैलापाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार असून शहरात गोळा होणारे मैलापाणी गोळा करण्यासाठी मैलापाणी वाहीन्यांचीही कामे करण्यात येणार आहेत. प्रक्रिया केल्यानंतरच नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीतील पाणी प्रदूषण कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे.

राज्य शासनाने आज मुळा- मुठा नदी सुधार कार्यक्रम (mula-mutha river rejuvenation project) आणि पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत योजनांच्या निधीचे परिणामकारक व्यवस्थापन आणि विनियोग करण्यासाठी सिंगल नोडल एजन्सी स्थापन करून उप सचिव दर्जाच्या अधिकार्‍याची नोडल ऑफीसर म्हणून नेमणूक केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title : Jica Project PMC | Jica river improvement project approved in first fortnight of December! In the first week, the tender will be sent to the Central Government for approval pune corporation pmc

 

हे देखील वाचा :

Anushka Sen | अनुष्का सेनची मालदीवमध्ये मस्ती ! बॅकलेस मोनोकनी आणि स्कूबा डायव्हिंग करत शेअर केले फोटो आणि व्हिडीओ

Nikki Tamboli | बर्थडे पार्टीमध्ये निक्की तांबोलीचा बोल्ड ड्रेस पाहून चाहते म्हणाले – ‘ही लवकरच उर्फी जावेद…’

Pune Crime | वारज्यातील निलेश गायकवाडसह 11 जणांवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 61 वी कारवाई

 

Related Posts