IMPIMP

Jitendra Awhad | ‘एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता, पण माझा जन्म 354 साठी झालेला नाही’ – आ. जितेंद्र आव्हाड

by nagesh
Jitendra Awhad | jitendra awhad stands on his comment about his shivaji maharaj controversial comment

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   राष्ट्रवादीचे (NCP) आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर भाजपशी (BJP) संबंधित एका महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

 

माझ्यावर राजकीय सुडापोटी षड्यंत्र करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर हर महादेव चित्रपट (Har Har Mahadev Marathi Movie) प्रकरणात देखील मला विनाकारण एक रात्र कोठडीत ठेवले होते. काल झालेला प्रकारही अयोग्य आहे. खून किंवा इतर कोणताही गुन्हा असता, तर ठीक होता. पण, विनयभंगाचा गुन्हा माझ्यावर दाखल झाला आहे. मी आयुष्यात कधी असे केले नाही. पोलिसांनी कसा काय गुन्हा दाखल केला, हे कळायला मार्ग नाही. मी काय शब्द वापरले, तो व्हिडिओ पण माझ्याकडे आहे. समाजात माझी मान शरमेने खाली जाईल, यासाठी हे षड्यंत्र आहे. माझ्या मुलीला तिच्या मैत्रीणी विचारत आहेत, की तुझ्या वडिलांनी विनयभंग केला का? त्यामुळे या राजकारणात न राहिलेले बरे. या राजकारणात एखाद्याचे घर उद्धवस्त होऊ शकते. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण होऊ नये, असे जितेंद्र आव्हाड यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मी सर्व काही मान्य करायला तयार आहे. पण, 354 आणि 376 मला मान्य नाही. यासाठी माझा जन्म झालेला नाही. ही गोष्ट माझ्या काळजाला लागली. माझ्यावर दुसरा कोणताही आरोप चालला असता. पण विनयभंग मला मान्य नाही. त्यामुळे या सरकारच्या दडपशाहीला आणि हुकुमशाहीला कंटाळून मी राजीनामा देणार आहे,
असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

 

दरम्यान, यावेळी पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी देखील आव्हाडांच्या बाजूने भूमिका मांडली.
त्यांनी सर्वप्रथम झालेल्या घटनेची चित्रफीत उपस्थितांना दाखविली आणि 354 कलमाची किंवा गुन्ह्याची
व्याख्या वाचून नंतर यात आव्हाड कुठे बसतात, असे प्रश्न उपस्थित केला.
जितेंद्र आव्हाड यांची समजूत काढण्यासाठी जयंत पाटील स्वत: त्यांच्या घरी पोहोचले.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील आव्हाडांनी राजीनाम्याचा विचार डोक्यातून काढून टाकण्याची विनंती केली आहे.

 

 

Web Title :- Jitendra Awhad | jitendra awhad jitendra awhad speaks over molestation case filed against him

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | ‘आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला उमेदवार मिळणार नाही’

Actress Priyanka Chopra | मिथुनच्या ‘या’ गाण्यावर डान्स करताना दिसली बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा, व्हिडिओ व्हायरल

Arbaaz Khan | “सलमानचा भाऊ आणि मलायकाचा…” अनेक वर्षांनंतर अरबाज खानच्या ‘या’ वेदना ओसरल्या

 

Related Posts