IMPIMP

Arbaaz Khan | “सलमानचा भाऊ आणि मलायकाचा…” अनेक वर्षांनंतर अरबाज खानच्या ‘या’ वेदना ओसरल्या

by nagesh
Arbaaz Khan | arbaaz khan have trouble with tag of salman khan brother and malaika arora husband actor expressed his pain

सरकारसत्ता ऑनलाईन- भारतीय चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून अरबाज खानने (Arbaaz Khan) खूप नाव कमावले आहे. विशेष म्हणजे अरबाज
खान हा दिग्दर्शकासोबतच होस्ट आणि निर्माताही आहे. महत्वाची बाब म्हणजे अरबाज खानवर अशी एक वेळ आली होती जेव्हा त्याने स्वत:ला अभिनेता
म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण दुर्देवाने त्याला त्यात यश मिळू शकले नाही. अरबाज खान (Actor Arbaaz Khan) हा त्याचा भाऊ सलमान
खान (Brother Of Salman Khan) आणि माजी पत्नी मलायका अरोरा (Malaika Arora) यांनी जितकी कमाई केली तितकी कमाई तो करू शकला
नाही. म्हणून त्या काळात याच कारणामुळे अरबाज खानला ‘सलमान खानचा भाऊ’ आणि ‘मलायका अरोराचा नवरा’ (Malaika Arora’s Husband)
म्हणून संबोधले जात होते. दरम्यान या चर्चांमुळे अरबाज खान नेहमी नाराज व्हायचा. दरम्यान खुप वर्षांनंतर त्याने आपली व्यथा मांडली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अरबाज खानच्या वेदना
अरबाज खानने एका मुलाखतीदरम्यान आपल्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलताना सांगितले की, एक काळ त्याच्या आयुष्यात असा होता की, जेव्हा तो ‘सलमान खानचा भाऊ’ आणि ‘मलायका अरोराचा नवरा’ म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे तो नेहमी नाराज असायचा. इतकच नाही तर यासोबतच अरबाज खानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याव्यतिरिक्त व्यावसायिक जीवनातील काही अपयशाबद्दलही सांगितले.

 

पुढे बोलताना अरबाज खान (Arbaaz Khan) म्हणाला की, आता जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला समजते की त्यात टेन्शन घेण्यासारखे काही नव्हते. मुळात आता या सर्व गोष्टींबाबत माझी कोणतीही तक्रार नाही. एक मात्र खर आहे की, आपण लोकांची मानसिकता बदलू शकत नाही. आणि मुळात मला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही.त्यामुळे जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्हाला दुसऱ्याच्या मताची गरज नाही.
महत्वाची बाब म्हणजे तुम्ही तुमचे यश साजरे करायला शिका.
अभिनेता म्हणून मी नेहमीच चांगल्या कामाच्या शोधात असतो, असही यावेळी बोलताना अरबाज खान म्हणाला.

 

दरम्यान आता अरबाज खान त्याच्या ‘टेन्शन’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.
तसेच सुधीर मिश्रा आणि सचिन कृष्णा यांनी ‘तनव’ ही वेबसिरीज (Webseries) दिग्दर्शित केली आहे.
विशेष म्हणजे या वेबसिरीजमध्ये अरबाज खानने कमांडरची भूमिका साकारली असुन फौदा
या लोकप्रिय इस्रायली शोची ही हिंदी प्रत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Arbaaz Khan | arbaaz khan have trouble with tag of salman khan brother and malaika arora husband actor expressed his pain

 

हे देखील वाचा :

Zerodha Nithin Kamath | ‘पैशांच्यामागे पळू नका, ‘या’ ठिकाणी गुंतवणूक करा’ – झिरोदाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत

Salaam Venky Movie | ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलिज , अभिनय आणि संवाद जिंकतील तुमचे मन

 

 

Related Posts