IMPIMP

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एलके इलेव्हन संघाचा दुसरा विजय; स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने उघडले विजयाचे खाते

by nagesh
Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | First 'Joshi Sports Karandak' Premier League T20 Cricket Tournament! Second win for LK XI; Spartans Cricket Club opened a winning account

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | जोशी स्पोर्ट्स तर्फे आयोजित पहिल्या ‘जोशी स्पोर्ट्स
करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत एलके इलेव्हन संघाने सलग दुसरा तर, स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने पहिल्या विजयाची नोंद करत गुणांचे खाते
उघडले. (Joshi Sports Cup Premier League T20 Cricket)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सिंहगड रोडवरील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत भूषण सवे याच्या १६० धावांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने आयोध्या वॉरीयर्स संघाचा ११५ धावांनी धुव्वा उडवित विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्पार्टन्स् क्रिकेट क्लबने २६७ धावांचा डोंगर उभा केला. भूषण सवे याने ६५ चेंडूत ८ चौकार आणि १८ षटकारांसह १६० धावांची खेळी केली. किरण देशमुख (३९ धावा) आणि नचिकेत कुलकर्णी (२५ धावा) यांनी दुसर्‍या बाजूने भूषणला साथ दिली. या धावसंख्ये समोर आयोध्या वॉरीयर्सचा डाव १५२ धावांवर मर्यादित राहीला. शंतनु गांधी याने नाबाद ७७ धावांची खेळी केली.

 

हृषीकेश आगाशे याच्या नाबाद ८८ धावांच्या जोरावर एलके इलेव्हन संघाने आयडीआज्-अ-सास संघाचा ६६ धावांनी पराभव केला. हृषीकेश आगाशे याच्या नाबाद ८८ धावा तसेच कुणाल गुप्ता (५९ धावा), शंतनु आठवले (२७ धावा) आणि अमित गणपुले (नाबाद २० धावा) यांच्या धावांच्या जोरावर एलके इलेव्हनने २०२ धावांचे आव्हान उभे केले. याचा पाठलाग करताना आयडीआज्-अ-सास संघाचा डाव १३६ धावांवर मर्यादित राहीला.

 

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | First 'Joshi Sports Karandak' Premier League T20 Cricket Tournament! Second win for LK XI; Spartans Cricket Club opened a winning account

 

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

स्पार्टन्स् क्रिकेट क्लबः २० षटकात ५ गडी बाद २६७ धावा (भूषण सवे १६० (६५, ८ चौकार, १८ षटकार), किरण देशमुख ३९, नचिकेत कुलकर्णी २५, यश तुंग २-२५) वि.वि. आयोध्या वॉरीयर्सः २० षटकात ९ गडी बाद १५२ धावा (शंतनु गांधी नाबाद ७७ (६३, १० चौकार, १ षटकार), विकी अवघडे २०, विशाल प्रभाकर ६-२२); सामनावीरः भूषण सवे;

 

एलके इलेव्हनः २० षटकात २ गडी बाद २०२ धावा (हृषीकेश आगाशे नाबाद ८८ (६१, १३ चौकार,
कुणाल गुप्ता ५९ (३२, १० चौकार, १ षटकार), शंतनु आठवले २७, अमित गणपुले नाबाद २०)
वि.वि. आयडीआज्-अ-सासः २० षटकात ९ गडी बाद १३६ धावा (सनी मट्टू ४५, रौनक टाँक १४, सुयश भट २-७);
सामनावीरः हृषीकेश आगाशे;

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | First ‘Joshi Sports Karandak’ Premier League T20 Cricket Tournament! Second win for LK XI; Spartans Cricket Club opened a winning account

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे 3 कोटीची खंडणी मागणार्‍या दोघांना अटक; कोल्हापूरच्या गडहिंग्जलमधील एकाचा समावेश (Video)

Nashik News | डाळिंब पिकाने घेतली उड्डाणे; आधुनिक शेतीचे गाव ‘सातमाने’

Sakinaka Fire News | मुंबईतील साकीनाका परिसरात अग्नितांडव, दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू; 9 जण थोडक्यात बचावले

 

Related Posts