IMPIMP

Journalist Shashikant Warishe Murder Case | पत्रकार शशिकांत वारिसे यांची जाणीवपूर्वक हत्या, विधानपरिषदेत सरकारची कबुली

by nagesh
 Journalist Shashikant Warishe Murder Case | journalist-shashikant-warishe-murder-case-Deliberate killing of journalist Shashikant Warise, government's confession in Legislative Council

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- Journalist Shashikant Warishe Murder Case | पत्रकार शशिकांत वारिसे यांचा जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणल्याची कबुली राज्य सरकारने (Maharashtra State Government) दिली आहे. विधान परिषदेत विरोधकांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला सरकारच्या वतीने लेखी उत्तर देण्यात आलं आहे. पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी (SIT Investigation) सुरु असल्याची माहिती देखील सरकारने लेखी उत्तरात दिली आहे. (Journalist Shashikant Warishe Murder Case )

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमधील (Rajapur Ratnagiri) पत्रकार शशिकांत वारिसे (Journalist Shashikant Warishe) यांचा घातपात झाल्याचे सरकारने विधानपरिषदेत लेखी उत्तरात म्हटलं आहे. रिफायनरीविरोधात (Nanar Refinery) बातम्या प्रकाशीत केल्याने त्यांची हत्या झाल्याची शंका विरोधकांनी व्यक्त केली होती. यावर राज्य सरकारने विधानपरिषदेत लेखी उत्तर देताना वारिसे यांचा अपघात घडवून आणल्याचे म्हटले आहे.

 

काय आहे प्रकरण?

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू (Accidental Death)
झाला. हा अपघात 6 फेब्रुवारी रोजी दुपारी झाला होता. वारिसे हे त्यांच्या दुचाकीवरुन जात असताना त्यांच्या
गाडीला पेट्रोल पंपासमोर एका वाहनाने जोरात धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या वारिसे यांना उपचारासाठी
रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांचं निधन झालं होतं. वारिसे यांना पंढरीनाथ आंबेरकरने अपघात घडवून
हत्या केल्याचा आरोप केला जात आहे. रिफायनरीमध्ये आंबेरकरच्या (Pandharinath Amberkar) जमिनी असल्याचा देखील आरोप होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Journalist Shashikant Warishe Murder Case | journalist-shashikant-warishe-murder-case-Deliberate killing of journalist Shashikant Warise, government’s confession in Legislative Council

 

हे देखील वाचा :

Blood Donation Camp In Pune | शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशन तर्फे 20 मार्च रोजी रक्तदान शिबीर

Unseasonal Rain In Maharashtra | शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pune Crime News | सरंक्षण खात्यातील ग्राहकांच्या नावे ४६ कार्सची केली परस्पर विक्री; खडकीच्या सी एस डी डेपोच्या नावाने बनावट धनादेश देऊन केली कोट्यवधींची फसवणूक

 

Related Posts