IMPIMP

JP Nadda | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ 2024 पर्यंत वाढवला

by nagesh
JP Nadda | jp nadda to continue as bjp national president till june 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP National President) म्हणून जेपी नड्डा (JP Nadda) यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) जेपी नड्डा (JP Nadda) यांच्या अध्यक्षतेखाली लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 16 आणि 17 या दोन दिवशी राजधानी दिल्लीत होत आहे. या बैठकीमध्ये भाजप आगामी विधानसभा (Assembly) आणि लोकसभा निवडणुकीबाबत विचारविनिमय झाला. तसेच या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. नड्डा यांचा पक्षाध्यक्ष म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ या महिन्याच्या अखेरीस संपणार होता.

 

 

नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत (Himachal Pradesh Assembly Election) भाजपचा पराभव झाल्यानंतर जेपी नड्डा यांचे काय होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती.
हिमाचल हे नड्डांचं गृहराज्य आहे. तिथेच पराभव झाल्याने नड्डांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून उचलबांगडी होणार
की त्यांना पुन्हा मुदतवाढ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मात्र भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नड्डांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

आगामी लोकसभा निवडणुका एका वर्षावर आल्या आहेत. यापूर्वी याच वर्षात 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही
आहेत. आता या सर्व निवडणुका जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली लढवल्या जाणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- JP Nadda | jp nadda to continue as bjp national president till june 2024

 

हे देखील वाचा :

Devendra Fadanvis | बीड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी खेळी; पंकजा मुंडे यांना डावलून ‘या’ नेत्याशी सलगी

Blue Brigade Running Club | “ब्ल्यू ब्रिगेड अल्ट्रा ३३८K” उपक्रमातून डायबेटिक मुलांसाठी निधीसंकलन

Police Recruitment | उच्चशिक्षित तरुणांची पोलीस शिपाईपदाकडे धाव, पोलिसांनी शिक्षणनिहाय केलेल्या वर्गवारीतून धक्कादायक वास्तव समोर; MBA, MCA, ME, B.Tech उमेदवारांचा समावेश

 

Related Posts