IMPIMP

Blue Brigade Running Club | “ब्ल्यू ब्रिगेड अल्ट्रा ३३८K” उपक्रमातून डायबेटिक मुलांसाठी निधीसंकलन

by nagesh
Blue Brigade Running Club | "Blue Brigade Ultra 338K" Fundraising for Diabetic Children

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Blue Brigade Running Club | ‘ब्लू ब्रिगेड रनिंग क्लब’ने एक स्तुत्य असा सामाजिक उपक्रम आयोजित केला
आहे. अजय देसाई, प्रशांत पेठे आणि श्यामल मोंडल हे तीन वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले अवलिया एकत्र येऊन “ब्ल्यू ब्रिगेड अल्ट्रा ३३८K” हा
उपक्रम राबविणार आहेत. यात ७२ तासात ३३८ किलोमीटर धावण्याचा त्यांचा मानस आहे आणि यातून टाईप १ डायबेटीस असणाऱ्या वंचित घटकातील
लहान मुलांसाठी मदतनिधी उभारण्यात येणार आहे. १८ जानेवारीला या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Blue Brigade Running Club)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लोणी येथील शिक्षा एज्युकेशन सोसायटीच्या इनोव्हेरा शाळेपासून रामदरा मंदिरापर्यंतचा २५ किमीच्या रस्त्यावर धावून हा उपक्रम पूर्ण केला जाईल. तसेच ‘ब्लू ब्रिगेड रनिंग क्लब’चे युसूफ देवसवाला आणि सतेज कल्याणी हे दोघे प्रत्येकी १६१ किमी धावतील. मागील अशाच उपक्रमाअंतर्गत मिळालेला २.५ लाख निधी टाईप १ डायबेटीस असणाऱ्या वंचित घटकातील लहान मुलांच्या उपचारासाठी कार्यरत असलेल्या नित्याशा फाऊंडेशनला देण्यात आला होता. यावर्षीही “ब्ल्यू ब्रिगेड अल्ट्रा ३३८K” या उपक्रमातून जास्तीत जास्त मदतनिधी संकलित करून नित्याशा फाउंडेशनला देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी सढळ हस्ते आपली मदत https://www.nityaasha.org/make-a-difference/ या वेबसाईटवर जाऊन जमा करावी असे आवाहन उपक्रमातील सर्व धावपटूंनी केले आहे. (Blue Brigade Running Club)

 

मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा सामना करत असलेल्या अजय देसाई यांनी फक्त धावण्यातून आपल्या
आजारांवर नियंत्रण मिळवले. याचा अनुभव आणि ज्ञान इतरांनाही देता यावे यासाठी त्यांनी २०१५ साली
‘ब्लू ब्रिगेड रनिंग क्लब’ची स्थापना केली. १० लोकांपासून सुरू झालेली ही सामाजिक संस्था आता तब्बल ६०० लोकांपर्यंत पोहोचली आहे, तसेच पुण्यातील ८ वेगवेगळ्या स्थळांवर कार्यरत आहे.

 

Web Title :- Blue Brigade Running Club | “Blue Brigade Ultra 338K” Fundraising for Diabetic Children

 

हे देखील वाचा :

Police Recruitment | उच्चशिक्षित तरुणांची पोलीस शिपाईपदाकडे धाव, पोलिसांनी शिक्षणनिहाय केलेल्या वर्गवारीतून धक्कादायक वास्तव समोर; MBA, MCA, ME, B.Tech उमेदवारांचा समावेश

ST Bus Accident | लातूर-पुणे-वल्लभनगर एसटी बसचा भीषण अपघात; 30 जण जखमी, 14 जण गंभीर

G-20 Summit In Pune | खा. वंदना चव्हाण यांचा जी 20 परिषदेवर आक्षेप, म्हणाल्या…

 

Related Posts