IMPIMP

Police Recruitment | उच्चशिक्षित तरुणांची पोलीस शिपाईपदाकडे धाव, पोलिसांनी शिक्षणनिहाय केलेल्या वर्गवारीतून धक्कादायक वास्तव समोर; MBA, MCA, ME, B.Tech उमेदवारांचा समावेश

by nagesh
Police Recruitment | The rush of highly educated youth to the post of police constable, the shocking reality of the education-wise classification of the police; Including MBA, MCA, ME, B.Tech candidates

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  देशात बेरोजगारी (Unemployment) दिवसेंदिवस वाढत असून उच्च शिक्षण (Higher Education) घेतल्यानंतर देखील हाताला काम मिळत नाही. त्यामुळे या तरुणांनी पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) नाव नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पोलीस भरती सुरु आहे. या पोलीस भरतीमध्ये उच्चशिक्षित तरुणांनी पोलीस शिपाई भरतीसाठी (Police Recruitment) नाव नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या शिक्षणनिहाय वर्गवारीतून हे धक्कादायक वास्तव समोर आले. पोलीस भरतीसाठी केवळ पदवीधरांनी नाही तर एमकॉम (MCom), एमबीए (MBA), एमएससी (MSc), बीई (BE), बी.टेक (B.Tech) झालेल्या हजारो तरुणांनी अर्ज केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे लोहमार्ग पोलिसांकडून (Pune Railway Police) मिळालेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलीस भरतीसाठी हजारो अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांची शिक्षणानुसार छाननी केली असता यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 12 वी झालेल्या 3 हजार 846 तरुणांनी अर्ज केला आहे. तर 3 हजार 136 पदवीधर तरुणांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केले आहेत. याशिवाय उच्चशिक्षितांनी देखील अर्ज केले आहेत.

 

उच्चशिक्षित-पदवीधर उमेदवार

बीए – 1,847, बीकॉम – 602, बीएस्सी – 646, बीसीए-बीबीए-बीसीए – 75, बीई -70, बीटेक -8,
एमए-193, बीकॉम- 75, एमएससी – 40, एमबीए – 12 उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज केले
असल्याची माहिती पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे (IPS Shrikant Dhiware) यांनी दिली आहे.

 

पोलीस शिपाई, चालक भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात आले आहेत.
संबंधित उमेदवारांनी प्रवेश पत्रात दिलेल्या तारखेला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहे.
एखादा उमेदवार त्या दिवशी आला नाही तर त्याला पुन्हा संधी दिली जाणार नाही.
ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून कोणी प्रलोभन दाखवल्यास अथवा गैरप्रकार
आढळून आल्यास तात्काळ संबंधीत पोलीस अधिकाऱ्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी भरतीसाठी
येणाऱ्या उमेदवारांना केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Police Recruitment | The rush of highly educated youth to the post of police constable, the shocking reality of the education-wise classification of the police; Including MBA, MCA, ME, B.Tech candidates

 

हे देखील वाचा :

ST Bus Accident | लातूर-पुणे-वल्लभनगर एसटी बसचा भीषण अपघात; 30 जण जखमी, 14 जण गंभीर

G-20 Summit In Pune | खा. वंदना चव्हाण यांचा जी 20 परिषदेवर आक्षेप, म्हणाल्या…

Pune Crime News | कर्जबाजारी झालेल्याने महिलेला लुटण्याचा प्रकार आला अंगाशी; कात्रजमधील संतोषनगर येथील घटना

 

Related Posts