IMPIMP

Kalyan Crime | मित्राने आधी घरी बोलवून मित्राला दिली मटण अन् दारुची पार्टी, त्यानंतर…., कल्याणमधील धक्कादायक प्रकार

by nagesh
 Kalyan Crime | A friend first invited him home and gave a mutton and liquor party to his friend, then..., a shocking type in Kalyan

कल्याण : सरकारसत्ता ऑनलाइन Kalyan Crime | कल्याण पूर्वेतील कोळसवाडी परिसरात मित्रानेच मित्राचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना आज (शनिवार) दुपारी घडली आहे. विपिन दुबे (Vipin Dubey) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून आरोपी राजेश्वर पांडे (Rajeshwar Pandey) याला पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक व्यवहारातून हा खून (Kalyan Crime) झाल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे (Kolsevadi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख (Senior Police Inspector Mahendra Deshmukh) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत हे मागील पाच वर्षापासून एकमेकांना ओळखत असून ते चांगले मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी मयत विपिन याला पैशांची गरज असल्याने त्याने आरोपी राजेश्वर पांडे याच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपीने विपिन याला साडेचार लाख रुपये उसने दिले होते. काही दिवसांनंतर आरोपीने विपिन याच्याकडे पैशांची मागणी केली. परंतु विपिन याने पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. (Kalyan Crime)

 

आज दुपारी आरोपी राजेश्वर याने विपिनला आपल्या घरी पार्टी असून घरी येण्यास सांगितले. मटण आणि दारुची पार्टी केल्यानंतर राजेश्वर याने विपिनकडे पैशांची मागणी केली. तो पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने संतप्त झालेल्या राजेश्वर याने दारुच्या नशेत कोयत्याने त्याच्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विपीनचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने स्वत: कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फोन करुन मी मित्राला मारले असल्याची माहिती दिली.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी त्या परिसरात असलेल्या बीट मार्शलला घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यास सांगितले.
बीट मार्शल घरी पोहचले त्यावेळी आरोपी घरामध्ये होता. तर विपिन याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
बीट मार्शलने पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी मृत विपिन याच्या नातेवाईकांना कळवलं.
विपिनच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी रामेश्वर पांडे याच्यावर खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Kalyan Crime | A friend first invited him home and gave a mutton and liquor party to his friend, then…, a shocking type in Kalyan

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | सत्तेपेक्षाही लोकशाही टिकवणे सध्या महत्वाचे, जयंत पाटील यांनी मांडली पक्षाची भूमिका

Nana Patole | नाना पटोलेंचे फडणवीसांना आव्हान, सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन कशासाठी मिळत होती ते सांगा

Women’s T20 Asia Cup | बांगलादेशवर 59 धावांनी मात करत भारताने गाठली उपांत्य फेरी

 

Related Posts